राडेबाजीचा श्रीगणेशा!
शिवसेनेतील बंडखोरी नंतर शिंदे गटाने भलेही भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले असेल तरी त्यांच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहील याची शाश्वती नाही कारण शिंदेंनी शिवसेनेला जो घाव दिला आहे तो इतक्यात भरून निघणार नाही. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील खुन्नस दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि त्यातून दोन्ही गटातील राडा सुरुवात झाली आहे.बुलढाण्यात जे काही घडले त्याला शिंदे गटाचे लोक जबाबदार आहेत असे स्थानिकांचे म्हणणे आहे कारण शिवसेनेतील बंडखोरी नंतर जे लोक शिवसेनेतून बाहेर पडले त्यांच्या जागी नव्या लोकांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत अशाच एका बुलढाण्यात झालेल्या शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या लोकांनी गोंधळ घातला त्यावरून दोन्ही गटात राढा झाला आणि इथूनच आता राडेबाजीचा श्रीगणेशा झाला आहे शिवसेनेत आजही बाळासाहेबांवर अपार श्रद्धा असलेले निष्ठावान लोक आहेत आणि ते शिवसेनेसाठी परसंगी जीव द्यायलाही तयार आहेत ही बाब शिंदे गटाच्या लोकांनी विसरू नये कारण भाजपच्या मदतीने आज सतेत आहात म्हणून दादागिरी करीत आहेत पण उद्या सत्ता गेल्यावर काय कराल
अजितदादा म्हणतात त्याप्रमाणे कुणीही सतेचा अमरपट घेऊन आलेला नसतो आणि भाजपच्या बद्दल तर लोकांच्या मनात तीव्र संताप आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किंवा त्यानंतर होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची एक हाती सत्ता येईल असे जे स्वप्न रंगवले जात आहे ते स्वप्नच राहणार आहे राहता राहिला सवाल शिंदे गटाचा तर त्यांचं भवितव्य ज्या दिवशी ते फुटले त्याच दिवशी निश्चित झाले आहे त्यामुळे आता राडेबाजी करून आपली ताकत दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.पण या राडेबाजी मधून महाराष्ट्राला काय मिळणार आहे कारण अशा राडेबाजी मुळे शिंदे गटाच्या विरुद्ध लोकांमधे आणखी असंतोष निर्माण होईल राहता राहिला सवाल भाजपचा तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनात भाजपच्या विषयी वेगवेगळ्या प्रकारची खदखद आहे तिचा कधीना कधी मोठा स्फोट होईलच! कदाचित आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याची झलक बघायला मिळेल पण शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पालिका निवडणुकीबाबत जे भाकीत केलेले आहे ते खरे ठरले तर महाराष्ट्रात अराजकता माजेल म्हणूनच शिंदे गटाने तसा विचारही करू नये कारण शिवसेना अजून संपलेली नाही आणि संपणार सुधा नाही .उलट शिंदे गट आणि शिवसैनिक यांच्यात राडेबाजी व्हायला लागली तर लोकांची सहानुभूती शिवसेनेला असेल कारण शिवसेना बाळासाहेबांची आहे तर शिंदे गटाला अजूनही भक्कम मायबाप नाही .भाजप आणि मनसेचा आज जरी टेकू असला तरी या टेकुंचा त्यांना फारसा फायदा होणार नाही म्हणूनच सध्या सतेत असलेल्या शिंदे गटाने शिवसेने बरोबर राडेबाजी करण्याचा विचार सोडून द्यावा कारण लोक कधीच सते सोबत नसतात हा आजवरचा इतिहास आहे आणि तोच शिंदे गटाने ध्यानात ठेवावा