टाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू- अपघात की घातपात ?
पालघर / टाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला काल मुंबई / अहमदाबाद महामार्गावर चारोटी जवळ त्यांच्या कारला भीषण अपघात होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान उप मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत आज गुजरात मधे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत
काल सायरस मिस्त्री हे मुंबईवरून त्यांच्या कारणे गुजरातला जात होते मात्र दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबई / अहमदाबाद महा मार्गावरील चरोटी जवळ असलेल्या सूर्य नदीच्या पुलावर त्यांची कार एका रस्ता दुभाजकावर आदळली आणि करचा पुढचा भाग पूणपणे चेपला गेला या अपघातात सायरस मिस्त्री आणि त्यांचा कारचालक गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेले जात असताना वाटेतच सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यू बद्दल पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री शिंदे उप मुख्यमंत्री फडणवीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे एका पारशी कुटुंबात जन्मलेले सायरस मिस्त्री यांनी लंडनच्या बिझनेस स्कूल मधून शिक्षण घेतले होते 2006 मध्ये ते टाटा उद्योग समूह मध्ये रुजू झाले आणि आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी टाटा उद्योग समूहाची भरभराट केली त्यामुळे 2012 मध्ये त्यांना टाटा सन्स चे अध्यक्ष बनवण्यात आले पण मिस्त्री यांनी काही तोट्यातील काही विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याने टाटा उद्योग समूहाला 13000 कोटींचा तोटा झाला त्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आले पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला या सर्व पार्श्वभूमीवर त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळेच या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात आलेत .