यंदा गरिबांची दिवाळी गोड होणार – फराळाच्या चार वस्तूंचे पॅकेज शंभर रुपयात
मुंबई – सध्या महागाईने शिखर गाठलेले आहे. घरगुती वापराच्या गॅस पासून जीवनावश्यक वस्तूंपर्यंतच्या दरात वाढ होत आहे . त्यामुळे सणासुदीच्या काळात गोर गरीब जनतेची मोठी आर्थिक कुचंबणा सुरु होती. मात्र राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावरच चणाडाळ,खाद्य तेल,रवा आणि साखर या फराळाच्या चार वस्तूंचे पॅकेज रेशन दुकानांवर फक्त १०० रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ दारिद्रयरेषेखालील १ कोटी ६२ लाख लोकांना मिळणार आहे
दिवाळीच्या पार्शवभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जीवनावश्यक वस्तूंच्या दारांवर चर्चा करण्यात आली . त्यानंतर रवा, चणाडाळ,खाद्य तेल आणि साखर या चार वस्तूंचे एक पॅकेज फक्त १०० रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गरिबांची दिवाळी जरी गोड होणार असली तरी सरकारच्या तिजोरीवर मात्र ५०० कोटींचा आर्थिक भार पडणार आहे. सध्या लोकांची दिवाळीची खरेदी सुरु आहे आणि साखर ४५ ते ५० रुपये किलो, चणा डाळ १२० ते १५० रुपये किलो , रवा ६० ते ८० रुपये किलो दराने मिळतोय. तर खाद्य तेल १६० ते २०० रुपये किलो दराने विकले जातेय . अशा स्थितीत गोरगरीब जनतेसाठी या वस्तू अवाक्या बाहेर होत्या . म्हणूनच सरकारने दारिद्रय रेषे खालील जनतेसाठी, फराळाच्या पदार्थांच्या वस्तूंचे एक पॅकेजच अवघ्या १०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेऊन गरिबांची दिवाळी गोडकेली आहे.