ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

जेल मध्ये टाकले तरी संप मागे घेणार नाही – एस .टी. कामगारांनी न्यायालयाचा आदेश धुडकावला

मुंबई/ संप करून लोकांना सणासुदीच्या काळात वेठीस धरू नका तुमच्या मागण्या सोडवण्या बाबत आम्ही सरकारला निर्देश देऊ असे मुंबई उच्च न्यायालयाने आश्वासन देऊनही एस टी कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आम्हाला जेल मध्ये टाकले तरी आम्ही माघार घेणार नाही असा निर्धार व्यक्त करून काल एस टी कामगारांनी न्यायालयाचे निर्देश सुधा धुडकावले त्यामुळे आता सोमवारच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण न्यायालय आणि सरकार दोघांचीही भमिका ठाम आहे एस ती कामगारांचे राज्य सरकारी सेवेत विलीन करा या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्यांसाठी एस्टी कामगार सध्या संपावर गेले आहेत .

error: Content is protected !!