ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

ना कोरोनाची भीती ,ना सरकारच्या नियमांची पर्वा, मोठ्या संख्येने भीमसैनिक चैत्यभूमीवर


मुंबई/ आज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दीन आहे.त्यामुळे कोरोणाची भीती न बाळगता तसेच सरकार आणि पालिकेच्या आवाहनाला न जुमानता बाबासाहेबाना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने भीमसैनिक तसेच महिला चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. महापालिकेने त्यांच्यासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या असून महापरिनिर्वान दीन शांततेत पार पडावा यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
करoणा प्रादुर्भाव कमी झाल्याने महाराष्ट्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी दिली त्यामुळे चैत्यभूमी सुधा दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे मात्र काही दिवसांपासून कोरोनचा नाव ओमायक्रोन ने जगभरात दहशत निर्माण केली आहे .भारतातही त्याचे काही रुग्ण सापडत आहेत मुंबईमध्ये आफ्रिकेतून जे एक हजर लोक आले त्यातील काही असावे असा पालिकेला संशय असल्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून यावेळी महापरिनिर्वाण दिनानमित्त पालिकेने नियमावली तयार केलीय तर सरकारने घरी बसूनच ऑनलाईन बाबासाहेबाना अभिवादन करा चैत्यभूमीवर येऊ नका असे आवाहन केले होते.पालिकेने सुधा चैत्यभूमीवर यंदा पुस्तकांचे किंवा खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यास मनाई केलीय तसेच चैत्यभूमीवर लसीकरण आणि कroणा टेस्ट ची सुविधा उपलब्ध करून देताना शक्यतो घरूनच ऑनलाईन दर्शन घ्या असे आंबेडकरी जनतेला आवाहन केले आहे .मात्र आंबेडकरी जनतेची बाबासाहेबांवर अफाट श्रद्धा असल्याने सरकार आणि पालिकेच्या आवाहनाला न जुमानता मोठ्या संख्येने भीम सैनिक महिला लहान मुले महाराष्ट्राच्या वेग वेगळ्या भागातून चैत्यभूमीवर आलेले आहेत.संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पालिकेकडून काल पासूनच साफ सफाई तसेच चीत्यभुमी आणि परिसराचे आहे. बाहेरून आलेल्या आंबेडकरी जनतेसाठी नेहमीप्रमाणे शिवाजी पार्क मैदानात थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यांच्यासाठी पाणी,फिरते शौचालय आरोग्य सेवा आदी उपलब्ध करून देण्यात आली असून काल रात्रीपासूनच दर्शनासाठी रंग लागलेली आहे .दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त असून राज्य राखीव दल,बॉम्ब शोधक पथक,होमगार्ड,आदी तैनात आहेत मात्र आज चैत्यभूमीवर झालेली गर्दी पाहून पालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता निश्चितपणे वाढलेली आहे

error: Content is protected !!