देवेंद्र फडणवीस तिसर्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – ‘आज आझाद मैदानावर मोदींच्या उपस्थितीत शपथविधी
मुंबई – महाराष्ट्रात विक्रमी बहुमत मिळवलेल्या महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली आहे. भाजपा विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले . त्यानंतर फडणवीस, शिंदे आणि पवार यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. आज सायंकाळी मुंबईच्या आझाद मैदानात पंतप्रधान मोदीच्या उपस्थितीत हजारोंच्या साक्षीने फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यानंतर महायुतीतील राष्ट्रवादी व शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी होईल नाराज असलेले एकनाथ शिंदे हे सुधा उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे समजते
राज्यातील भाजपा आमदाराची बैठक बुधवारी सकाळी पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची गटनेता म्हणून एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर लगेचच बुधवारी दुपारी महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला.
राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महायुतीच्या नेत्यांनी भेट घेऊन महायुतीच्या नेत्यांनी सत्तास्थापनेचा दावा करणारे पत्र दिले. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यपालांना पत्र देण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते
यावेळी प्रफुल्ल पटेल, रावसाहेब दानवे, उदय सामंत उपस्थित होते. पक्षनिरीक्षक निर्मला सीतारामन, विजय रुपाणी, विनोद तावडे, धनंजय मुंडे उपस्थित होते. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महायुतीमधील भाजप नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिन्ही नेत्यांनी भेट घेत महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा दावा केला.राज्यपाल यांची भेट घेत महायुतीकडे सत्तास्थापनेसाठी असलेल्या आमदारांच्या संख्याबळाचे पत्र तिन्ही नेत्यांनी दिले. महायुती सरकारच. पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होईल. गुरुवारी सायंकाळी आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तसेच इतर काही मंत्र्यांचाही शपथविधी होणार असेल तर त्याची घोषणा गुरुवारी रात्री करण्यात येणार असल्याचे समजते