ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पत्रकार दिनाबाबत-बाळ शास्त्री जांभेकर यांना कोटी कोटी प्रणाम

६ जानेवारी २०२२ पत्रकार दिन बाळ शास्त्री जांभेकर यांचा आज जन्म दिवस मुंबईतील इलीकस्टन कॉलेजमध्ये शिकत असताना समाजात वावरत असताना शास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश याबरोबरच अनेक रूढी चाली रीती अज्ञान दारिद्रय भाकड समजुती यामुळे समाज कसा व्याधीग्रस्त झालाय या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवलं की केवळ महाविद्यालयात शिकून उपयोग नाही.तर संपूर्ण समाजाला धडे दिले पाहिजेत श्रीपती शेषाद्री नावाच्या मुलाला योग्य मार्ग दाखवला मात्र लवकरच समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र काढायला हवं असं त्यांना वाटू लागले त्या जाणवतेन आपले सहयोगी गोविंद कुमठे आणि भाऊ महाजनच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिलं वृत्तपत्र काढलं. ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठीत ठेवण्यात आली. तरी ब्रिटिश सरकारपर्यन्त आपला आवाज जावा या हेतूने वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा वृत्तपत्राची किंमत एक रुपया होती. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारं हे वृत्तपत्र या अंकात दोन स्तंभ असायचे उभ्या मजकुरात एक स्तंभ कॉलम मराठीत तर एक स्तंभ इंग्रजीत असे मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहलं हे राज्यकर्त्यांना कळावं यासाठी इंग्रजी मजकूर होता वृत्तपत्राची संकल्पना त्यावेळी लोकांना नवी होती. त्यामुळे दर्पणची वर्गनी सुरवातीच्या काळात कमी होती. पण हळू हळू ही संकल्पना रुजली त्यातील विचारही रुजले प्रतिसाद वाढला दर्पणवर प्रथमपासूनच बाळ शास्त्री जांभेकरांच्या व्यक्ती महत्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्ष चालले दर्पणचा शेवटचा अंक जुलै १८४० हा शेवटचा अंक प्रकाशित झाला. दर्पण वृत्तासोबत मराठीतील पाहिल मासिक दिग्दर्शन त्यांनी जुलै १८४० साली सुरू केले. दिग्दर्शन मधून भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत भाऊदाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी पाच वर्ष काम केले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन, नकाशे आकृतीच्या साह्याने प्रसिद्ध केले. या माध्यमातून त्यांनी लोकांची आकलन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला. ६ जानेवारी १८३२ रोजी जांभेकर पाहिलं दर्पण हे मराठी वृत्तपत्र काढलं दर्पण या वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी भाषेचा मजकूर असायचा तो लोकांना आवडू लागला. त्याच बरोबर सार्वजनिक ग्रंथालयाच महत्व ओळखून बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली. हिंदुस्थानी भाषेचे ते अध्यापन करत त्यांच्या प्रकाशित साहित्य कृतीमध्ये लेखी कथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप हिंदुस्थानाचा इतिहास शून्यलय गणित या ग्रंथांचा समावेश आहे. दर्पण हे बाळ शास्त्री यांनी त्यांच्या हातातील एक लोकशीक्षणाच माध्यम होतं. त्याचबरोबर पुनर्विवाहाच्या चळवळी झाल्या ज्ञान, बौद्धिक, विकास ह्या गोष्टी अनेक त्यांना महत्वाच्या वाटू लागल्या त्यामुळे त्यांच विचारमंथन होवून त्याच रूपांतर पुढं विधवा, पुनर्विवाहांच्या चळवळीत झाला. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणं हे त्यांचं स्वप्न होते. थोडक्यात आज सारख्या ज्ञाननिष्ठ समाज त्यांना २०० वर्षां पूर्वीचा अपेक्षित होता. असे हे बाळ शास्त्री जांभेकर यांना कोटी कोटी प्रणाम असा हा ६ जानेवारी २०२१ पत्रकार दिन.|पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा|

error: Content is protected !!