ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

अनाथांची माय!

काही माणसं अशी असतात की ती दुसऱ्यासाठी जगत असतात.दुसऱ्याच्या सुखात आपले सुख मानत असतात त्यासाठी आपल्या सर्व इच्छा,आशा आकांशा वर पाणी सोडतात.अशांपैकी च एक होत्या वात्सल्य मूर्ती सिंधुताई सकपाळ! १९४८ एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सिंधुताई फक्त चौथी पर्यंत शिकल्या आणि त्यावेळच्या रूढी परंपरा नुसार वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचा बाल विवाह झाला.पती पत्नीच्या नात्याचा अर्थही कळतं नसलेल्या वयात बाल विवाह झाल्याने संसाराच्या चार भिंतीत त्यांचं बालपण हरवल गेलं त्या गर्भवती असतानाच त्यांच्या पोटावर लाथ मारून पती ने त्यांना घराबाहेर काढले महरचेही मार्ग बंद झाले त्यामुळे जगण्यासाठी त्यांच्यावर भिक मागण्याची पाळी आली.कुठल्याही स्वाभिमानी स्त्रीच्या आयुष्यात जेंव्हा असे प्रसंग येतात तेंव्हा नको हे जीवन त्यापेक्षा आत्महत्या केलेली बरे असे वाटू लागते सिंधूताईंच्या मनात सुधा आत्महत्येचा विचार येत होता पण एके दिवशी एका गरीब अनाथ मुलाला स्टेशनवर भीक मागताना त्यांनी बघितले आणि त्यांच्यातली वात्सल्य आणि करुणामय माय माउली जागी झाली त्यानंतर त्यांनी त्या मुलाला जवळ केले आणि तेंव्हा पासून त्यांना जगण्याचा मार्ग सापडला त्यानंतर अनेक अनाथ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांनी उचलली आणि टी समर्थपणे पेलून दाखवली ज्या अनाथ मुलांना त्यांनी जवळ केलं त्यांना शिक्षण दिलं चांगले संस्कार दिले आज त्यातीलच अनेक जण उच्च पदावर पोचले आहेत कुणी डॉकटर ,कुणी इजीनियार तर कुणी कलेक्टर आहेत.आज जिथे स्वतः जन्माला घातलेल्या मुलांचा सांभाळ करणे त्यांना शिक्षण देणे लोकांना कठीण होऊन बसले आहे तिथे अनाथ मुलांचं कोण कशाला पालकत्व स्विकरील पण सिंधुताई यांनी ती जबाबदारी उचलली आणि त्यांनी केवळ त्या मुलाचं संगोपन च केले असे नाही तर त्यांना मोठ करून त्यांची लग्न काऱ्य सुधा लाऊन दिली आज त्यांना ३०० जावयी सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे आणि त्यात त्या सुखी समाधानी होत्या पण वयाच्या ७२ व्या वर्षी काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि अनाथांची ही माय सर्वांना पोरके करून निघून गेली.त्यामुळे त्यांच्या अनाथ आश्रमात शिकणाऱ्या १५०० मुलांचे पुढे काय? सरकारने याची जबाबदारी घ्यायला हवी किंवा सिंधू ताईंनी ज्यांच संगोपन करून ज्यांना मोठ केलं अशा लोकांनी पुढे येऊन ही जबाबदारी हवी
सिंधूताईंच्या या कार्याचा देश विदेशात खूप गौरव झाला त्यांना जवळपास७०० छोटे मोठे पुरस्कार मिळाले त्यात भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराचा सुधा समावेश आहे. त्यांच्या जीवनावर मी सिंधुताई सकपाळ हा मराठी चित्रपट सुधा निघाला होता ज्याची खूप प्रशंसा झाली.मात्र एक गोष्ट खरी सिंधुताई यांच्या कार्यासाठी सरकार कडून त्यांना जेवढी मदत मिळायला हवी होती तेवढी मिळाली नाही समाजात सिंधुताई सारखी दुसऱ्यांसाठी जगणारी माणसे खूप दुर्मिळ असतात म्हणूनच अशा माणसांना जपायला हवं त्यांच्या सामाजिक कार्याला हातभार लावायला हवा. काशी विश्वेश्वर मंदिराच्या कॉरिडॉर साठी ४०० कोटी आणि पुतळे व स्मारकांसाठी हजार पाचशे कोटी खर्च करणाऱ्या सरकारने समाजात समाजातील जिवंत माणसांसाठी काम करणाऱ्या लोकांना सरकारच्या आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना मदत करावी जेणेकरून तो पैसा खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल अनाथांचा या वात्सल्य मूर्ती मायला भावपूर्ण श्रद्धांजली!

error: Content is protected !!