ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

उत्तर प्रदेशात गो- कल्यानासाठी असलेला निधी सरकारी अधिकाऱ्यांनी लाटला

यूपीत रोज ५० हजार गाईंची कत्तल भाजपा आमदाराचा आपल्याच सरकारला घरचा आहेर
लखनौ/यूपीतील योगी सरकार हे गोरक्षक आणि सनातन धर्माचे रक्षण करते म्हणून ओळखले जाते परंतु प्रत्यक्षात वस्तू स्थिती मात्र वेगळी आहे आणि सत्ताधारी भाजपाच्या आमदाराने हे उघडकीस आणले आहे भाजपचे आमदार गुजर यांनी जाहीरपणे आरोप केला आहे की उत्तर प्रदेशात गायींच्या कल्याणासाठी असलेला निधी सरकारी अधिकाऱ्यांनी लाटला मात्र त्यांच्यावर अजूनही कारवाई झाली नाही त्याचबरोबर उत्तर प्रदेशात गोवंश रक्षणाचा कठोर कायदा असतानाही रोज 50 हजार गायींची कत्तल केली जाते अशावेळी सरकार काय करते असा थेट सवाल त्यांनी आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना केला आहे गुजर यांच्या या आरोपामुळे भाजपा मोठी खळबळ माजली आहे
आमदार गुजर म्हणाले की उत्तर प्रदेश मधील सरकार हे हिंदू हिताच्या रक्षणासाठी आहे असे असताना हिंदूंच्या हिताचे रक्षण करण्याऐवजी सरकारमधील काही अधिकारी हिंदूंच्या अधिकारांवर घाला घालीत आहेत हिंदूंमध्ये गाईला गोमातेचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे हिंदू गोमातेची पूजा करतात असे असताना काही ठिकाणी मात्र गो हत्या केली जात आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेक गोशाळा बांधल्या या गोशाळेतील गाईंच्या कल्याणासाठी सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून दिला परंतु हा निधी उत्तर प्रदेश मधल्या भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी परस्पर लाटला इतकेच नव्हे तर अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत उत्तर प्रदेशात रोज पन्नास हजार गाईंची कत्तल केली जाते हे अत्यंत भयानक आहे योगी सरकारने तात्काळ अशा घटनांची गंभीर दखल घेऊन जे कोणी गोरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपा आमदार गुजर यांनी केली आहे

error: Content is protected !!