ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजनमुंबई

कुटुंबासह पहावा असा- लावण्य दरबार


रविवार 6 फेब्रुवारी रोजी दामोदर हॉल परळ येथे ।स्मित हरी प्रोडक्शन निर्मित ।।लावण्य दरबार।हा लावण्यांनाचा कार्यक्रम हाऊसफुल झाला तो फक्त आणि फक्त महिलांच्या 90 %उपस्थितीत।
खर तर लावणी म्हटलं की महिला वर्ग लांबच असायचा कारण लावणी म्हणजे पुरुषांनी चोरून पहावा असा तमाशा।हा पूर्वग्रह ।पण लावण्य दरबार नि हा समज खोटा ठरवला तो महिलांनाच याची गोडी लावून ।
गण मुजराणी आणि गवळण ने सुरेख सुरुवात होते।नंतर बैठीकाच्या लावण्यांचा पाच आपल्याला मंत्रमुग्ध करतो।लावणी साम्राज्ञा मेघा घाडगे यांची प्रीतीचा प्याला ।आशमीक ची पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा।कविता घडशी ने सादर केलेली नठले तुमच्यासाठी।चांदणी ची रात्र धुंदीत ही जागवा आशा एकाहून एक सरस लावन्या प्रेक्षकांना मोहित करतात।
पाय मुरगळलेला असूनही मेघा घाडगे च बहारदार नृत्य।पुरुष असूनही एखाद्या स्त्रीला लाजवेल अशी आशमीक ची अदाकारी।आणि चांदणी ने घेतलेला 3 वेळा वन्समोर म्हणजे लावण्य दरबार च्या शिरपेचात मनाचा तुराच।अंबिकाची पुण्याची मैना ही लावणी सुध्दा टाळ्या मिळवून गेली।
सदर कार्यक्रमात परळ मधील असंख्य महिलाआपल्या कुटुंबसहित उपस्थित होत्या।महिला बचत गटांनी तर मेघा घाडगे हीचा पनवेल नगरपालिकेत मतदार यादी नोंदणी साठी आवाहन केलं होतं त्या बद्दल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केला। या प्रसंगी निर्माते हरी पाटणकर ।सचिन पाताडे उपस्थित होते।किरण पाटील यांचे निवेदन कार्यक्रमाचा शिखर च जणू।
अतिशय उत्कृष्ट बांधणी आणि दर्जेदार कलाकृती असलेला आणि महिलांनी गौरवलेला कुटुंबसहित पहावा असा हा दरबार म्हणजेच लावण्य दरबार।-प्रशांत भाटकर

error: Content is protected !!