सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत ८९ कोटींची वाढ
दिल्ली – वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांच्या उत्पनात कशी आणि किती वाढ झाली आहे याची माहिती एडीआरच्या अहवालात देण्यात आली आहे . यात राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत ८९. ८३ कोटींनी वाढ झाली आहे .
एडीआरच्या रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये१७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २००९ मध्ये सुप्रिया सुळे यांची संपत्ती ५१ . ५३ कोटी रुपये इतकी होती. २०१९ मध्ये १७३ टक्क्यांनी वाढून १४० . ८८ कोटी रुपये इतकी झाली. दहा वर्षात सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये ८९. ८३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान,एआयडीयु चे खासदार बदरूद्दीन अजमल यांच्या संपत्तीमध्ये 160 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2009 मध्ये त्यांची संपत्ती 30 कोटी रुपये होती तर २०१९ मध्ये त्यांची संपत्ती 78 कोटी रुपये इतकी झाली एडीआर अहवाल :२००९ ते२०१९ या काळात सलग तीन वेळा खासदार झालेल्या७१ नेत्यांच्या संपत्तीमध्ये सरासरी 286 टक्के वाढ झाली आहे. भाजप खासदार रमेश चंदप्पा जिगाजिनागी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. या रिपोर्ट्सनुसार, ज्या दहा खासदारांची संपत्ती सर्वाधिक वाढली त्यामध्ये भाजपच्या सहा खासदारांचा समावेश आहे. तर शिरोमणी अकाली दल, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजू जनता दल आणि एआयडीयूएफ च्या एका खासराचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, अपक्ष खासदारांसह ७१ खासदारांची २००९ मध्ये सरासरी संपत्ती ६. १५ कोटी रुपये इतकी होती२०१९ मध्ये यामध्ये २८६ टक्क्यांनी वाढ झाली असून त्यांची सरासरी संपत्ती १७. ५९ कोटी रुपये झाली आहे. दरम्यान, मागील दहा वर्षात भाजपच्या खासदारांच्या संपत्तीमध्ये सरासरी ४२ पटीनं वाढ झाल्याचेही रिपोर्ट्समध्ये म्हटलेय.