अमित शहांचा विरोधकांवर सर्जिकल स्ट्राईक
जळगाव – केंद्रीय मंत्री अमित शाह हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांनी युवा संमेलनाच्या माध्यमातून हजारो तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पवारांसह महाविकास आघाडीवर सडकून टीका आहे.
अमित शाह म्हणाले की, शिवाजी महाराजांनी स्वकीय भावना निर्माण केली. देश आज जो उभा आहे त्याची पायाभरणी शिवाजी महाराजांनी केली आहे. २०२४ च्या निवडणुकीच्या बाबतीत बोलण्यासाठी मी आलोय. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी मतदान आहे. या गैर समजात राहू नका. २०२७ ला विकसित भारत बनविण्यासाठी मतदान आहे. भविष्यासाठी मतदान आहे, युवकांच्या भविष्यासाठी मतदान आहे.
इंडिया आघाडीतले सर्व पक्ष घराणेशाही मानणारे आहेत. जे पक्ष आपल्या पार्टीत लोकशाही नाही, तर परिवारवादाच्या पार्टीत आहेत. त्या देशात ते लोकशाही ठेवू शकतील का? उद्धव ठाकरेंना आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचंय, शरद पवारांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचे आहे. त्यांना त्यांच्या मुला-मुलींना मुख्यमंत्री बनवायचं, तुमच्यासाठी काही नाही. तुमच्यासाठी फक्त मोदी आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
पुलवामामध्ये आतंकवादी आलेत. १० दिवसांत पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्टाईक केले. काश्मीर आपला हिस्सा आहे की नाही. ३७० कलम ७० वर्ष काँग्रेसने हटविले नाही. मोदींना दोनदा पंतप्रधान केले. त्यांनी ३७० हटविले. राहुल गांधीम्हणत होते खून की नदीया येतील. पण खून की नदी सोडा साधा दगड उचलण्याची हिंमत नाही झाली, अशी टीका राहुल गांधींवर केली मुद्रा लोण दिले, स्टार्टअप दिले, डिजिटल व्यवहार झालेत, रेल्वे ट्रॅक बनविले, रोज गॅस सिलेंडर 50 हजार लोकांना दिले, गरिबीतून लोकांना बाहेर काढले. नळातून पाणी काढले. पवार साहेब 50 वर्षांपासून राज्यातील जनता तुम्हाला सहन करते आहे. तुम्ही ५ वर्षाचा आढावा द्या. तिसऱ्या वेळी मोदींना ४०० पार खासदार नेण्यासाठी समर्थन करा, असा टोला त्यांनी शरद पवारांना लगावला.
राम मंदिर आधी बनायला हवे होते की नाही. काशी कॉरिडॉर बनायला हवे होते की नाही. काँग्रेसने मतासाठी रामलल्लाला तंबूत ठेवले. काशी कॉरिडॉर आम्ही तयार केले. अयोध्येत राम मंदीर आधीच बनायले हवे होते, वोट बँकच्या भितीमुळे काँग्रेसने केले नाही. विधानसभेसाठी 30 टक्के जागा महिलांना आरक्षित ठेवणार आहे. मोदी सरकारने लस देऊन भारताला कोरोना मुक्त केले. २०३० मध्ये जगातील तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होईल. सोनिया गांधी तिसऱ्यावेळी राहुल बाबाला लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१९ मध्ये लॉन्च झाले नाहीत.असेही ते म्हणाले