ई डी ची आजवरची सर्वात मोठी कारवाई शिवसेनेला हादरा! संजय राऊत यांची संपती जप्त
मुंबई/ शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांची इडीने संपती जप्त केल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीत मोठी खळबळ माजी आहे तर मी अशा कारवायांना घाबरत नाही असे संजय राऊत याने म्हटले आहे.
प्रवीण राऊत प्रकरणात इडिने संजय राऊत यांच्या पत्नीचीही चौकशी केली होती मुंबईतील पत्रा चाल पुनर्विकास प्रकल्प गुरू आशिष कंपनीकडे विकासासाठी दिला होता मात्र त्यांनी या भूखंडाचा एफ एस आय परस्पर विकला यात 1034 कोटींचा घोटाळा झाला होता याच घोटाळ्यातील काही पैसे संजय राऊत यांना मिळाले होते राऊत यांच्या पत्नीने याच पैशातून 55 लाख रुपये कर्ज घेतले होते अर्थात चौकशीत हे सर्व उघडकीस आल्याने हे पैसे परत करण्यात आलेला प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे नातेवाईक आहेत त्यामुळे राऊत यांच्यावरही ईडी ची कारवाई होत आहे काल इडीनी राऊत यांचे अलिबाग येतील 8 जागा आणि मुंबईच्या दादर मधील एक फ्लॅट जप्त केलाय आणखी काही संपती जप्त होण्याची शक्यता आहे या कारवाईमुळे शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे
बॉक्स
मी इडीला फाट्यावर मारतो/ राऊत
मी ईडीच्या कारवाईला घाबरत नाही माझ्याकडे असलेली संपती ही माझ्या मेहनतीची आहे जर त्यात काही चुकीचे आढळले तर माझी सर्व संपत्ती मी भाजपच्या नावावर करीन तसेच मी चौकशीला सामोरे जायला तयार आहे असे राऊत यांनी सांगितले