मोदींचा सोने तारण योजनेत राहुल गांधींची गुंतवणूक
नवी दिल्ली/राजकारणी किती दूर तोंडी असतात हे पुन्हा एकदा बघायला मिळाले आहे काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोदींवर रोज उठून टीका करीत असतात त्यांच्या योजना किती फसव्या आहेत हे लोकांना सांगत असतात परंतु याच राहुल गांधी मोदींच्या एका गोल्ड योजनेत 15.. 27 लाखांची गुंतवणूक केलेली आहे अशी माहिती उघडकीस आलेली आहे राहुल गांधी यांनी वायदळ लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना संपत्तीच्या विवरण पत्रामध्ये ही माहिती नमूद केलेली आहे पण या माहितीमुळे राहुल गांधींची आता मोठी पंचायत झालेली आहे कारण एकीकडे ते मोदींच्या योजनेवर टीका करतात आणि दुसरीकडे त्यांच्याच योजनेमध्ये पैसे गुंतवतात हा सगळा प्रकार चीड आणणारा आहे त्यामुळे भाजपाला आता राहुल गांधींवर टीका करायला एक मोठा मुद्दा मिळालेला असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात या मुद्द्याचा विरोधक चांगलाच वापर करणार असल्याचे समजते
