मुंबईकर जनता व भाजपच्या आंदोलनामुळे सरकार झुकले लोकल ट्रेनचा निर्णय दोन दिवसात
मुंबई/ मुंबईतील कोरोंनाची पोजिविटी रेट कमी झालेला असतानाही केवळ टास्क फोर्स च्या सांगण्यावरून मुंबईकरांचा लोकल प्रवास रोखणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात काल भाजपच्या नेतृत्वाखाली मुंबईकर रेल्वे प्रवासी रस्त्यावर उतरताच महा विकास आघाडी सरकारच्या पायाखालची जमीन सरकली त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय सरकार येत्या दोन दिवसात घेणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
लॉक डाऊन आणि कठोर निरर्बाधाळेअगोदरच लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत लोक बेरोजगार झालेत . आता कुठे अनलॉक प्रक्रिये अंतर्गत हळू हळू उद्योग धंदे सुरू होत असताना सर्वसामान्य जनतेसाठी लोकल ट्रेन अजूनही बंद ठेवण्यात आलेली असल्याने मुंबई बाहेरून मुंबईत कामाला येणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय आणि लोकांना होणारा हा त्रास दिसत असतानाही टास्क फोर्सचा सला ऐकून लोकांना त्रास देत आहेत.याबद्दल न्यायालयानेही तीव्र नाराजी व्यक्त करीत बस मधली गर्दी चालते मग लोकल मधली गर्दी का नाही चालत असा सवाल केला होता .मुंबईकरांच्या मनातील हाच संताप व्यक्त करण्यासाठी काल भाजपने मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर आंदोलन केले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सायन रेल्वे स्थानकात आंदोलन केले तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चर्चगेट स्थानकात आंदोलन करून चर्चगेट ते दहिसर असा प्रवास केला त्यामुळे पोलिसांनी त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली रेल्वे स्थानकात आंदोलन केले तर आमदार संजय केळकर यांनी ठाणे रेल्वे स्थानकात आंदोलन केले .या आंदोलनाला मुंबईकरांनी प्रचंड प्रतिसाद देत सरकार यांच्या विरोधात घोषणा दिल्या.अखेर मुंबईकरांचा हा जन प्रक्षोभ बघून सरकारने पुढील दोन दिवसात लोकल ट्रेन सर्वसामान्य जनतेसाठी खुली करण्या बाबतचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे .लसीचे दोन डोस घेतलेल्यांना केवळ लोकल प्रवासच नव्हे तर इतर बाबींमध्ये सवलत दिली जाणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले
शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढील आठवड्यात
कोरोंनाच्या भीतीमुळे गेल्या पंधरा महिन्यांपासून शाळा कॉलेज बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले आहे दहावी बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकन पद्धतीने निकाल लावावा लागला पण त्यावर पालक आणि विद्यार्थीही नाखूष आहेत त्यामुळे आता शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असून शिक्षक पालक,आणि सरकार यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांशी अंतिम चर्चा करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.