महाराष्ट्र एकीकरण समिती मधील फुटिमुळे भाजपचा मोठा विजय-बेळगावात मराठी अस्मितेचे पानिपत
बेळगाव/महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादात सीमा भागातील मराठी अस्मिता जिवंत ठेवणाऱ्या आणि कर्नाटक सरकारशी सातत्याने संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती मध्ये फूट पडुन मते विभागली गेल्यामुळे बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय झाला आणि मराठी अस्मितेचे बेळगावात अक्षरशः पानिपत झाले महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी हा फार मोठा धक्का समजला जास्त आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादात बेळगाव हे लढ्याचे मुख्य केंद्र होते आणि सीमा भागातील मराठी बांधवांनी आजवर हा किल्ला अभेद्य राखला होता .महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सीमा भागातील मराठी जनतेने कर्नाटक सरकारचा अन्याय अत्याचार सहन करीत इथल्या कानडी झुंडशाही विरुद जोरदार संघर्ष सुरू ठेवला होता .त्यामुळे आजवर बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता होती पण मधल्या काळात महाराष्ट्र एकीकरण समितीत फूट पडली त्यातच बेळगाव शहराच्या वार्ड पुनर्रचना प्रक्रियेत कानडी प्रशासनाने मोठ्या खुबीने मराठी विभाग फोडले त्याचा फटका बसला आणि बेळगाव महापालिकेच्या ५८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ३० जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवित बेळगाव महापालिकेवर आपला झेंडा फडकवला .महाराष्ट्र एकीकरण समितीला २१ पैकी अवघ्या २जागा जिंकता आल्या तर काँग्रेसला ७जागा मिळाल्या एम आय एम ने सुधा येथे खाते उघडले आहे बेळगाव महापालिका निवडणुकीतील हा पराभव केवळ सीमा भागातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या जिव्हारी लागलेला आहे .कारण या पुढे बेळगावात कानडी गुंडांची मुजोरी वाडणार आहे तर मराठी माणसांची सातत्याने आणखी गळचेपी होणार आहे .
बॉक्स/सीमा भागातील मराठी माणसाच्या पराभवाने चंद्रकांत दादा आनंदित
बेळगाव महापालिकेत भाजपचा विजय आणि सीमा भागातील मराठी बांधवांचा पराभव झाल्याने महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील प्रंचड आनंदित झाले आहेत त्यांनी बेळगावच्या जनतेचे अभिनंदन करताना भाजपचे बहुतेक नगरसेवक मराठी असल्याचे म्हटले आहे