ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रात पुन्हा कठोर निर्बंध रात्रीची संचारबंदी?

मुंबई/ करोनाचा तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता असून यात रात्रीच्या साचरबंदीचाही समावेश असेल याबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसात घेतला जाणार आहे
गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे खरेदीसाठी मार्केट मध्ये लोकांची झुंबड उडते आहे त्याचा परिणाम म्हणून राज्यात करोनाची रुग्णसंख्या वाढायला लागली आहे .म्हणूनच राज्य सरकार पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा विचार करीत असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सांगितले .
करोनाचा प्रभाव ओसरल्याने ब्रेक द चेन अंतर्गत बहुतेक उद्योगधंदे सुरू झाले होते तसेच करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवाशाची मुभा देण्यात आली होती त्यामुळं गर्दी वाढली आणि करेनाचा प्रादुर्भाव सुधा वाढला आज महाराष्ट्रात ३६०० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली तर ३८ जणांचा मृत्यू झाला त्यामुळेच पुन्हा निर्बंध लावले जाणार आहेत .

error: Content is protected !!