ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

कुस्तीपटू विनेश फोगट , बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये दाखल – विनेशला हरयाणाच्या जुलाना मधून उमेदवारी

नवी दिल्ली – पॅरिस ऑलिम्पिक गाजवलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटने अखेर शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत कुस्तीपटू बजरंग पुनियाही काँग्रेसवासी झाली. यावेळी विनेश यांनी पहिल्यांदाच मीडियाशी बोलताना भाजपवर जोरदार प्रहार केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी.वेणुगोपाल यांनी विनेश आणि बजरंग यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी हरियाणा काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते. राजकारणात नवी इनिंग सुरू केल्यानंतर मीडियाशी बोलताना विनेश म्हणाल्या, आपले कोण हे वाईट काळात कळते. आम्हाला जेव्हा रस्त्यावर फरफटत नेले जात होते तेव्हा भाजपला सोडून सगळे पक्ष आमच्या बाजूने उभे होते. आमच्या अश्रूंना हे पक्ष समजून घेत आहे, अशी टीका विनेश यांनी भाजवर गेली.
महिला विरोधात होत असलेल्या अन्यायाविरोधात उभ्या असलेल्या पक्षाशी मी जोडले गेल्याचा मला अभिमान आहे. ते रस्त्यासह संसदेपर्यंत लढाई लढण्यास तयार आहेत. कुस्ती खेळत असताना आम्ही जो त्रास सहन केला तो त्रास देशातील महिलांना होऊ देणार नाही, असा विश्वास विनेशने व्यक्त केला.
भाजपच्या आयटी सेलने आम्ही राजकारण करत असल्याचे आमच्या आंदोलनावेळी पसरवले होते. नॅशनल चॅम्पियनशिप खेळणार नाही, ऑलिम्पिकमध्ये थेट जायचे आहे, असे पसरवण्यात आले होते, असे आरोपही विनेशने केले. मी ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहचले, पण देवाच्या मनात वेगळेच होते. देवाने मला देशाच्या लोकांची सेवा करण्याची संधी दिली, यापेक्षा चांगले काम असू शकत नाही, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!