ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आदित्य ठाकरे च्या वरळी मतदार संघातील कार्यकर्ते मनसेमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का


मुंबई/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सक्रिय झाले आहेत आणि आपापल्या मतदारसंघांमध्ये पक्ष बांधणी करीत आहेत तसेच केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्राचे दौरे करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला मतदार संघनिहाय सर्व माहिती घेतली आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले राज ठाकरेंच्या मनसेची मुंबईत मोठी ताकद आहे आणि याच ताकदीचा वापर करून मुंबईतील काही प्रस्थापिकांना धक्का देण्याचे काम राज ठाकरे करणार आहेत. त्यानुसार शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाला सुरुंग लावण्याचे काम आता सुरू झालेले आहे त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे गटाचे उपनेते मनोज जामसुतकर यांचे खंदे समर्थक अमित मटकर आणि हरीश जावळेकर हे मनसेच्या गळाला लागले या त्या दोघांसह ठाकरे गटाच्या वरळीतील अनेक कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघातील आदित्य ठाकरे यांची ताकद काही प्रमाणात कमी होणार आहे आणि त्याचा ठाकरे गडाला अर्थातच निवडणुकीत मोठा फटका बसणार आहे

error: Content is protected !!