साताधरी आघाडीतील फाटाफूट भाजपच्या पथ्यावर कोणाची सरशी आज फैसला
मुंबई/ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीचा आज निकाल असून सत्ताधारी महाविकास आघाडीतील फाटाफूट भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याने भाजपा नेते खुश आहेत त्याचबरोबर बहुतेक पक्षांनी ओबीसी उमेदवार दिलेले असल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत ओबीसी ची ताकत दिसून येणार आहे
काल नंदुरबार,धुळे,वाशिम,नागपूर, अकोला आणि पालघर आदी ६ जिल्हा परिषदा आणि १४४पंचायत समित्यांची पोटनिवडणूक झाली मात्र सर्वच ठिकाणी सताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केलेले असल्याने त्याचा फायदा भाजपला होणार आहे काल सकाळी मतदान संथ गतीने होते तर दुपारी काही ठिकाणी मतदान केंद्रे ओस पडली होती सायंकाळी मात्र गर्दी वादळी मात्र या पोटनिवडणुकीत ५० ते ५५टक्के मतदान झाले आणि आज मतमोजणी होणार आहे .नागपूर जिल्हा परिषदेच्या १६जागांसाठी पंचायत समितीच्या ३३गटांसाठी पोटनिवडणूक पर पडली मात्र काँग्रेस नेत्यांमधील दुफळी सर्वच ठिकाणी दिसून आली काँग्रेस मध्ये कुठेही एकी दिसत नव्हती त्यातच रामटेकचे काँग्रेस आमदार देशमुख यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर पक्षाने चौकशीचा बडगा उगारला आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या तीव्र मतभेद असल्याने केदार इकडे फिरकलेच नाही.नंदुरबार आणि धुळे येथेही तोच प्रकार होता काही ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे केले होते त्यामुळे विरोधकांच्या मतांमध्ये मोठी फूट दिसून आली परिणामी भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे मात्र मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिलाय ते आज कळेल
बॉक्स/ पालघर मध्ये भाजपा उमेदवाराचा सेना उमेदवाराला पाठिंबा
या निवडणुकीत महा विकास आघाडीतील फूट स्पष्टपणे दिसत असतानाच पालघरमध्ये जिल्हा परिषदेच्या १५तर पंचायत समितीच्या १४जागांसाठी मतदान झाले यापैकी एका मतदार संघात भाजपच्या किरण वेंगडे यांनी शिवसेनेच्या नीलम पाटील यांना पाठिंबा दिल्याने भाजप मध्ये मोठी खळबळ माजली आहे