ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत भाजपला रोखण्यात सत्ताधाऱ्यांना यश – महा विकास आघाडीची सरशी

  • जिल्हा परिषद ८५ जागा
    भाजपा २२,
    शिवसेना १२
    काँग्रेस १७
    राष्ट्रवादी १८
    इतर. १६
    पंचायत समिती १४४ जागा
    भाजप. ३३
    शिवसेना. २२
    काँग्रेस ३५
    राष्ट्रवादी १६
    इतर ३८
  • मुंबई -जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपला रोखण्यात महा विकास आघाडीला वेगवेगळे लढून सुधा यश आले आहे भाजपला केवळ धुळे जिल्हा परिषदेत यश मिळाले तर नागपूर नंदुरबार मध्ये काँग्रेस वाशिम मध्ये राष्ट्रवादी आणि अकोल्यात वंचित ने बाजी मारली
  • मंगळवारी जिल्हा परिषदेच्या ८५तर पंचायत समितीच्या १४४जागांसाठी ५५ ते ५७ टक्के मतदान झाले होते काल या निवडणुकीची मतमोजणी होऊन दुपारपर्यंत निकाल जाहीर झाला नागपूर मध्ये काँग्रेसने बाजी मारताना जिल्हा परिषदेच्या १६ पैकी ९ जागा जिंकल्या तर भाजपला ३ व राष्ट्रवादीला २आणि अपक्षणा २जागा मिळाल्या शिवसेनेची पती मात्र कोटी राहिली.वाशिम मध्ये राष्ट्रवादीने १४पैकी सर्वाधिक ५ जागा जिंकून सत्ता राखली इथे भाजपला २ सेनेला १ काँग्रेसला २ तर आपक्षणा २जागा मिळाल्या धुळ्यात मात्र १५ पैकी ८ जागा जिंकून भाजपने बाजी मारली येथे राष्ट्रवादीला ३ तर काँग्रेस आणि सेनेला प्रत्येकी २जागा मिळाल्या अकोल्यात ६ जागा जिंकून वंचित बहुजन आघाडीने सत्ता राखली तर पालघर मध्ये १५पैकी शिवसेना भाजपला प्रत्येकी ५ जागा मिळाल्या येथे काँग्रेसची पती कोरी असली तरी राष्ट्रवादीने ४आणि माकपने १जागा जिंकल्याने सत्ता शिवसेनेकडे असेल
  • या पोट निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे महा विकास आघाडीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे लडले तरी त्यांना यश मिळाले आणि महा विकास आघाडीची सरशी झाली

बॉक्स/ पालघरमध्ये खासदार पुत्र पराभूत
पालघरमध्ये शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांचा भाजपा उमेदवाराने पराभव केल्याने सेनेत मोठी खळबळ माजली आहे या पराभवाने राजेंद्र गावित कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापले असल्याचे समजते

error: Content is protected !!