ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

शक्ती प्रदर्शन चां मेळाव्यातून ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सामना

मुंबई/ काल महाराष्ट्रात शिवसेना आणि शिंदे गट यांचे दोन वेगवेगळे मेळावे पार पडले यात ठाकरे आणि शिंदे यांनी एकमेकांना गद्दार म्हटले आहे .त्यामुळे गद्दरीच्या या सामन्याने मुंबईकरांचे चांगलेच मनोरंजन झाले त्यामुळे आता नेमका गद्दार कोण हे लोकांनीच निवडणुकीत ठरवायचे आहे .
शिवतीर्थावर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे वर कडाडून हल्लाच . होय आम्ही तुम्हाला गद्दार म्हणणार असे शिदे गटाला ठणकावून सांगितले तसेच मी आजारी असताना ज्यांच्याकडे मोठ्या विश्वासाने शिवसेनेची जबाबदारी सोपवली तो कटप्पा निघाला आणि त्याने पाठीत खंजर खुपसला भाजप आणि आमच्यात मुख्यमंत्री पदाच्या बाबत अडीच अडिच वर्षांचा करार झाला होता हे मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो . पण भाजपने पाठीत खंजीर खुपसला म्हणून महाविकास आघाडी स्थापन केली.हिंदुत्व बाबत बोलताना ते म्हणाले आमचे हिंदुत्व खरे आहे भाजपने आम्हाला त्याबाबत शिकवू नये . ज्यांनी पाकिस्तानात जीनाच्या कबरीवर जाऊन डोके टेकवले ज्यांनी नवाझ शेरीफ याच्या पार्टीत जाऊन केक खाल्ला . ज्यांनी काश्मीर मध्ये मेहबूबा सोबत युती केली ते आम्हाला काय हिंदुत्व शिकवणार असेही त्यांनी सांगितले .

दरम्यान बीकेसी येथील मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्ही गद्दार नसून तुम्हीच गद्दार आहात असा उद्धव ठाकरेंवर आरोप केला तसेच आम्ही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत तुम्ही बाळासाहेबांचे विचार विकलेत आणि खुर्चीसाठी हिंदुत्व सोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलात गद्दरीची सुरुवात तुम्ही फार पूर्वी पासून केलीत . राणेंना मुख्यमंत्री व्हायला द्यायचे नव्हते . दिघेंच्या संपती ची चौकशी तुम्हाला करायची होती असा आरोप शिंदेंनी केला तसेच मुख्यमंत्री झाल्यापासूनच कामाचा आढावा घेतला दोन्ही मेळाव्याना प्रचंड गर्दी होती
बॉक्स
जयदेव ठाकरे शिंदे गटात
बाळासाहेबांचे जेष्ठ चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे .ते व्यासपीठावर शिंदेंच्या सोबत बसले होते आणि त्यांनी सर्व बरखास्त करून शिंदेंना पुन्हा निवडून द्या आणि त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवा असे जनतेला आवाहन केले ‘

error: Content is protected !!