मुंबईत मोठा गृहनिर्माण घोटाळा उघडकी -सग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दोन बिल्डरांना अटक
मुंबई : घराच्या प्रतीक्षेत असलेल्या गरजूना बिल्डर लोक कशाप्रकारे फसवतात हे अनेक वेळा लोकांनी पाहिलेले आहेत. एकाच खोली तीन ते चार लोकांना विकण्याच्या घटनाही उघडकीस आलेल्या आहेत. फ्लॅट विकण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या अशाच दोन बिल्डरांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. धर्मेश जैन व राजीव जैन अशी या बिल्डरांची नवे असून न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे. .
फ्लॅट विकण्याच्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक करण्याच्या गंभीर आरोपाखाली मुलुंड स्थित निर्मल लाईफ स्टाईल बिल्डर्सला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. बिल्डर धर्मेश जैन आणि राजीव जैन यांना आज सकाळी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे पोलिसांकडे आतापर्यंत एकूण फ्लॅट खरेदी करणाऱ्यांनी तक्रार केली आहे. जवळपास ११ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलंय. मात्र तक्रारदारांची ही संख्या आणि फसवणुकीची रक्कम ही जास्त असल्याचा पोलिसांना संशयव्यक्त केलाय.
आरोपींची सर्वसामान्य लोकांना फ्लॅट देण्याच्या नावाखाली फसवणूक केली. फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेतले. मात्र अनेक वर्ष उलटले तरीदेखील ग्राहकांना त्यांचे फ्लॅट दिले गेले नाहीत. या प्रकरणी २०२२ मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलीस या प्रकरणी तपास करत होते. या दरम्यान अनेकांनी तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी तपासाला जास्त गती दिली आणि अखेर बिल्डर धर्मेश जैन आणि राजीव जैन या दोघांना अटक करण्यात आली. दोघांना आज संबंधित कोर्टात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धर्मेश जैन हे निर्मल लाईफ स्टाईल या कंपनीचे संचालक आहेत. जैन यांनी अनेक प्रकल्प सुरू केले. मात्र ज्या लोकांनी फ्लॅटची बुकिंग केली त्यांना वेळेवर फ्लॅट मिळाले नाहीत. त्याचबरोबर त्यांनी जे पैसे गुंतवले होते ते पैसे देखील त्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे संबंधित ग्राहकांनी पोलिसांकडे दाद मागितली होती.