३० वर्षांच्या न्यायालयीन सेवेतून सूर्यकांत बंडू जाधव निवृत्त
सातारा- औद्योगिक व कामगार न्यायालय सातारा येथे ३० वर्ष सेवा बजावल्यानंतर सूर्यकांत बंडू जाधव हे सेवेतून निवृत्त झाले आहेत. आपल्या सेवा काळात त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सर्वांशी आपुलकीचे संबंध ठेऊन सेवा बजावली . अध्यात्म आणि भक्ती मार्गातील सूर्यकांत जाधव यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी आपल्याभोवती मोठा जनसमुदाय गोळा केलेला आहे. निवृत्ती नंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला . दिनांक 30.10 2021 रोजी कार्यालयात सेवानिवृत्ती चा समारंभ घेण्यात आला .त्यावेळी औद्योगिक व कामगार न्यायालयाचे कर्मचारी आणि न्यायाधीश उपस्थित होते.त्यांच्या पुढील वाटचालीस मुंबई जनसता कडून हार्दिक शुभेच्छा




