फॅशन स्ट्रीटचां आगीतून भ्रष्टाचाराचा धूर
मुंबई/ दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध अशा फॅशन स्ट्रीट येथे लागलेल्या आगीतून पालिका आणि पोलिसाच्या भ्रष्टाचाराचा धूर निघत आहे . कारण या फॅशन स्ट्रीट वर जे गाळे आहेत त्यातील बरेच गाळे बेकायदेशीर आहेत किंवा ज्यांच्याकडे गुमस्ता परवाना आहे त्याने अर्धी फूट पाथ अडवली आहे . सर्वात महत्वाचे म्हणजे या गळ्याना जो वीजपुरवठा केला जातो तो बेकायदेशीर आणि चोरीच्या विजेचा आहे .पोलीस आणि पालिका प्रशासनाला हे सर्व ठाऊक असतानाही त्यांना हप्ते मिळत असल्याने ते काहीच कारवाई करीत नाहीत असे या भागातील कार्यालयात काम करणारे लोक म्हणतात. मुंबई सारख्या महानगरात जर अशा प्रकारे बेकायदेशीर गाळ्याना चोरीची विज मिळत असेल तर मुंबईला वीज पुरवठा करणारी बेस्ट विज पुरवठा कंपनी काय करते . फॅशन स्ट्रीट च्या गाळे वाल्या बरोबर बेस्टच्या विद्युत पुरवठा अधिकाऱ्यांचे सुधा आर्थिक साटेलोटे असल्याचा आरोप केला जातोय . दोन दिवसांपूर्वी फॅशन स्ट्रीट येथे लागलेली आज बेकायदा चोरीच्या विज कनेक्शन मध्ये झालेल्या शॉक सर्कीट लागल्याची माहिती मिळतेय .त्यामुळे या आगीची चौकशी करून या बेकायदा गाळ्यांचे आश्रयदाते असलेल्या पालिका आणि बेस्ट चां अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केलेली आहे .
मुंबई महापालिका ए प्रभागातील अतिक्रमण विरोधी पथक आणि अनुज्ञापन अधिकारी याच्या मिलीभगतने फॅशन स्ट्रीट वरील बेकायदेपणा अनेक वर्षापासून चालू आहे. येथील मिळण्यान्या हप्तेखोरी मुळे अधिकारी मालामाल झाले आहे . येथील अधिकारी कधी कधी कारवाईची नौटंकी करतात . अनेक गाळेधारक व्यवसाय परवाना बोर्ड लावण्याचे पालिकेने दिलेले आदेश फाटयावर मारून नियमाची पायमल्ली करताना दिसतात पंरतु पालिका अधिकारी कारवाई करत नाही . याबाबत मुंबई जनसत्ता अनेक वेळा बातमी छापून संबंधित सहाय्यक आयुक्त आणि अनुज्ञापन अधिकारी यांच्या निदर्शनास आणले होते .