ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेना उद्धव गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय

मुंबई/ शिवसेनेच्या दोन गटातील राजकीय संघर्ष पाहता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत मोठा विजय झाला.पाणी पडले तरी मशाल विकली नाही त्यामुळे आता मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागा अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व मतदार संघात पोट निवडणूक झाली या निवडणुकीसाठी पूर्वी मोरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती पण पवार आणि राज ठाकरे यांनी सादर निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती . त्यामुळे भाजपने उमेदवार मागे घेतले मात्र ऋतुजा लटके यांच्या विरोधात 7 अपक्ष रींगत राहिल्याने निवडणूक झाली या निवडणुकीत 32 टक्के मतदान झाले होते . आज या निवडणुकीचा निकाल लागला आणि ऋतुजा लटके याना 66 618 मते मिळाली आणि त्यांच्या विरोधातील सर्व अपक्षांची डिपॉझिट जप्त झाली .मात्र या निवडणुकीत नोटाला 12721 मते मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे ही सर्व मते भाजची आहेत असा आरोप ऋतुजा लटके यांनी व्यक्त केला .

error: Content is protected !!