महायुतीकडून दहा मोठ्या घोषणा – लाडक्या बहिणीला मिळणार दीड हजार ऐवजी २१०० रुपये
कोल्हापूर/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने आज कोल्हापूरमध्ये प्रचाराचा नारळ फोडला महायुतीच्या या पहिल्या संयुक्त सभेत मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस यांनी जनहिताच्या १० मोठ्या योजना जाहीर केल्या त्यामध्ये लाडक्या बहिणी योजने ची रक्कम पंधराशे वरून २१०० करण्यात आली आहे तर वृद्धांसाठीच्या पेन्शन मध्ये ६०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलात २५००० महिलांची भरती केली जाणार आहे .तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी दहा हजार रुपये दरमहा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. अंगणवाडी सेविका आणि अशा सेविकांना दहा हजार योगी 15000 रुपये मानधन दिले जाणार आहे तसेच त्यांना विम्याचे कवच देखील दिले जाणार आहे. पंतप्रधान किसान हमे योजनेची रक्कम बारा हजार वरून पंधरा हजार करण्यात आली आहे तसेच वीज बिलात 30 टक्के सूट दिली जाणार आहे
आज कोल्हापूर मधील महायुतीच्या पहिल्याच जाहीर सभेमध्ये अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे म्हणतात सुरत मध्ये शिवाजी महाराजांचा मंदिर बांधायचा आहे पण सुरत मध्ये मोदींनी यापूर्वी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा केलाय उद्धव ठाकरेंना जर शिवाजी महाराजांचे मंदिरच बांधायचं असेल तर चला मुंब्रा मध्ये बांध जाऊन बांधूया तुमची आहे तयारी का असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला तर पक्ष चोरले पक्ष चोरले पक्ष सोडले असा कांगावा का केला जातोय जे काही झालं ते कायदेशीर मार्गाने झालं निवडणूक आयोग आणि न्यायालयाच्या संमतीने झालेले आहे त्यामुळे कोणी कोणाचा पक्ष सोडलेला नाही असे अजित पवार म्हणाले तर मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीवर टीका करणाऱ्यांना अत्यंत कठोर शब्दात खडे बोल सुनावले या लोकांनी किती जरी काही केलं तरी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचा सरकार येणार आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या विरोधात जे लोक न्यायालयाकडे खटले दाखल करीत आहेत अशा लोकांचे न्यायालयाने चांगलेच कान उपटले आहे पण यापुढे लाडक्या बहिणीने त्यांना मिळणाऱ्या पैशांमध्ये जो कोणी खोडा घालेल त्याला जोडा दाखवावा असे आवाहन केले आहे