ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पर्यायी व्यवस्थेशिवाय सी सी रोड साठीच्या खोदकामास परवानगी नाही

मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून सिमेंट कॉंक्रिट (सी सी) रोडच्या कामासाठी निविदा प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे. मुंबईत खड्डेमुक्तीसाठी सीसी रोडचा पॅटर्न महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आला आहे. महानगरपालिकेकडून सी सी रोडसाठी खोदकामाच्या परवानगीबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. अतिशय अपरिहार्य कारण असल्यावरच ही परवानगी देण्यात येईल असेही परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे. सीसी रोडच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना तसेच अभियंत्यांना स्पष्ट सूचना देणारे परिपत्रकच जारी केले आहे. त्यानुसार पर्यायी व्यवस्थेच्या शोधाशिवाय कुणीही खोदकामासाठीच्या प्रस्तावाची फाईल सादर करू नये असेही बजावण्यात आले आहे

अनेक नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्यांच्या ठिकाणी अनेक वॉर्ड तसेच विविध यंत्रणांच्या माध्यमातून खोदकामासाठी परवानगी मागणारे अर्ज येत असल्याचे पालिकेने म्हटले आहे. डिफेक्ट लायेबिलिटी पिरियड (डीएलपी) च्या आधीच अनेक ठिकाणी खोदकामासाठी परवानगी मिळावी म्हणून अर्ज आल्याचेही त्यांनी नमुद केले आहे. त्यामुळेच नव्याने बांधण्यात आलेल्या सी सी रोडच्या ठिकाणी कोणतीही परवानगी यापुढे देण्यात येणार नाही असे परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे. तसेच टाळण्यासारखी परिस्थिती नसेल अशा वेळीच ही परवानगी देण्यात येईल असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे

error: Content is protected !!