ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

छगन भुजबळ दंगल भडकविण्याचं काम करतायेत – मनोज जरांगे पाटील


अकोला : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांची अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चरणगावात जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत जरांगेंनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. “हा दोन जातीत दंगल भडकवायला लागलाय. मराठा ओबीसीतच आहे हे माहिती झाल्याने तो दंगल भडकावण्याचे प्रयत्न करतोय. त्याचं स्वप्नं पूर्ण होऊ देऊ नका”, अशी जहरी टीका जरांगे पाटील यांनी केली. त्याचवेळी धनगरांनी भुजबळांना पाठिंबा देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केलं.
सरकारने स्थापन केलेल्या समित्यांनी सांगायचं मराठ्यांच्या नोंदी नाहीत. आपण त्यावर विश्वास ठेवायचा, येथेच आपला घात झाला आहे. आतापर्यंत ३५ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात. हेच आरक्षण मराठ्यांना ७० वर्षांपुर्वी दिला असता तर आम्ही जगात एक नंबरचा समाज झालो असतो. आज नेत्यांपेक्षा सामान्यांत मोठी ताकद आहे, त्यामुळे आपली एकजूट ठेवा, असं जरांगे म्हणाले.
जरांगे पाटील भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले की, “आज अकोल्यातील एवढ्या छोट्या गावात एवढी गर्दी होतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. आरक्षण असलेले मराठेही आज ताकदीने या आंदोलनात सोबत येत आहेत, हा सरकारसाठी इशाराच आहे. दरम्यान आरक्षण असलेल्या मराठ्यांनी आरक्षण नसलेल्या भावांसाठी समोर यावं. राजकीय फायद्यासाठी राजकीय नेते आपल्यात उभी फूट पाडायचा प्रयत्न करतील असं होऊ देऊ नका” असेही त्यांनी सांगितले

error: Content is protected !!