ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राहुल गांधी देशद्रोही असल्याचा भाजपचा आरोप


दिल्ली – कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी हे देशद्रोही असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते संबीत पत्र यांनी केला आहे .त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. हा आरोप करणारे संबीप पात्र यांनी माफी मागावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संबित पात्रा यांनी दिल्लीस्थित पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राहुल गांधींना देशद्रोही म्हणत जोरदार हल्ला चढवला आहे. एका फ्रेंच वृत्तपत्रातील २ डिसेंबरच्या बातमीचा हवाला देत पात्रा म्हणाले की, काही शक्ती भारताच्या एकतेला तोडू पाहत आहेत. त्या शक्तींचा भाग असलेला एक धोकादायक त्रिकोण भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.
या त्रिकोणाच्या एका बाजूला ओसीसीआरपी नावाचे एक मोठे न्यूज पोर्टल आहे, अमेरिकेच्या काही संस्था आहेत. दुसऱ्या बाजूला अमेरिकेचे जॉर्ज सोरेस नामक व्यक्ती आहेत. तर तिसऱ्या बाजूला राहुल गांधी आहेत. फ्रेंच वृत्तपत्रानुसार ओसीसीआरपी या न्युज पोर्टलला ओपन सोसायटी फाउंडेशन नामक संस्था जवळजवळ ७०% मदत करते. एखादी संस्था न्युज पोर्टलला जेव्हा ७०% मदत करते तेव्हा ते पोर्टल निष्पक्ष राहू शकत नाही. जॉर्ज सोरेस नामक व्यक्ती ओपन सोसायटी फाउंडेशनचे प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यामुळे स्वाभाविकच ओसीसीआरपी सोरेसच्या हितासाठी बोलत आहे.
पत्र म्हणाले की, ओसीसीआरपी या न्युज पोर्टलने सातत्याने भारतविरोधी भुमिका घेतली आहे. कोवॅक्सिन लस असो वा भारतातील उद्योगपती याबद्दल ओसीसीआरपीनेच कायम चुकीची माहिती छापली. एकप्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेला उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारला धक्का लावण्याचा प्रयत्न केला आणि ओसीसीआरपीवर प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या आधारे राहुल गांधींनी कायम सरकारवर हल्ला चढवला. पिगासस प्रकरणातही हेच झाले. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहुल गांधी कसे निर्दोष आहेत हे सांगण्याचा प्रयत्न ओसीसीआरपीने केला. त्यामुळे ओसीसीआरपी, त्यांना मदत करणारे जॉर्ज सोरेस आणि राहुल गांधी हे एकच आहेत, असाही आरोप पात्रा यांनी केला.
पात्रा म्हणाले की, ओपन सोसायटीचे पदाधिकारी असलेले सलील शेट्टी भारत जोडो यात्रेत राहुल गांधीसोबत चालले. भारतविरोधी बोलणारे ओसीसीआरपीसाठी काम करणारे अमेरिकेतील अन्सारी नामक पत्रकार राहुल गांधीसोबत त्यांच्या विदेश दौऱ्यात बोलताना दिसत आहेत. या घटनांचे फोटोही पात्रा यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. तसेच ओसीसीआरपीचे पत्रकार आनंद मगलाने यांनी चीनमधून पैसे आणून दिल्ली दंगलीशी संबंधित शर्जिल इमामला दिले होते. मगलाने यांचे राहुल गांधीशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे जिथे देशाचे अहीत आहे, तिथेच राहुल गांधी कसे असतात, असा प्रश्न विचारत राहुल गांधींना भारताच्या एकात्मतेशी आणि सार्वभौमत्वाशी खेळायचे आहे, असाही गंभीर आरोप पात्रा यांनी केला.

error: Content is protected !!