अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीसयांनी तिसर्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
bbbमुंबई – महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदही शपथ घेतली . त्यांच्या सोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता लवकरच या सरकारचे इतर म्मंत्री आणि त्यांची खाती जाहीर होतील . या शपथविधीला स पंतप्रधान मोदी पासून अभिनेता सलमान खान पर्यंत तसेच क्रिकेटचा देव सचिन पासून उद्योगपती मुकेश अंबानी पर्यंत अनेक मान्यवर उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि त्यानंतर आज (५ डिसेंबर) रोजी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पडला. मुंबईतील आझाद मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीदेखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली.
‘ शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जेपी नड्डा यांच्यासह भाजपाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते उपस्थित होते. या भव्य सोहळ्याला मनोरंजन तसेच क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी देखील उपस्थिति लावल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईतील आझाद मैदान येथे पार पडलेल्या शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणाऱ्यांमध्ये एका व्हिडीओमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्यासोबत बसलेला दिसत
आहे .याशिवाय संजय दत्त, रणवीर सिंह, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित नेने, जॅकी श्रॉफ आणि अर्जून कपूर या कलाकारांनी देखील देवेंद्र फडणवीस याच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने देखील या सोहळ्याला हजेरी लावली.