महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह चैत्यभूमी मुंबई येथे डॉ आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते माजी खासदार व लेखक डॉ नरेंद्र जाधव यांनी लिहिलेल्या ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर : भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.