ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

जिवंत राहिलो असे तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांग – मोदी सुरक्षेवरून पंजाब सरकार अडचणीत


मुंबई/ सतेचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या सरकारला त्रास देण्याचं धोरण काही नवीन नाही यापूर्वी केंद्रात सत्ता असताना जे काँग्रेसने केले तेच आता भाजप करीत आहे पंत प्रधान मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत ज्या त्रुटी निर्माण झाल्या होत्या त्याचे खापर आता पंजाब मधील काँग्रेस सरकारवर फोडून सरकार बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत
बुधवारी पंतप्रधान मोदी याना पंजाब मधील हुसेनिवला येथे शहीद स्मारकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी जायचे होते ते भटेंनडरा येथून हेली कॉफ्टरणे जाणार होते पण खराब हवामानामुळे त्यांनी रस्ते मार्गे जाण्याचा निर्णय घेतला वास्तविक या बदललेल्या रूट बाबतच्या निर्णयाची माहिती पंजाब पोलिसांना द्यायला हवी होती पण ती दिली नाही .त्यामुळे रस्त्यात एकाठीकानी शेतकऱ्यांनी पंत प्रधान यांचा ताफा अडवण्यासाठी फिल्डिंग लावली त्यामुळे पंतप्रधान यांच्या ताफ्याला २० मिनिटे फ्लाय ओव्हर ब्रिजवर थांबावे लागले आणि तिथूनच माघारी फिरून भटेंनडरा विमानतळाकडे जावे लागले.पंतप्रधान ज्या मार्गाने जातात तो मार्ग खुला आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारची असते आणि आता याच चुकीचे खापर पंजाब सरकारवर फोडून ते सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कारण पंतप्रधान मोदींनी भटेंनडरा विमानतळावर पोचतच जिवंत राहिलो असे तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांग असा तिथल्या सुरक्षा यंत्रणेकडे निरोप ठेवला . आता या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे .पंतप्रधान मोदीनी मार्ग बदलताना स्थानिक पोलिसांना कळवले नाही असा खुलासा पंजाब सरकारने केला असून एक चौकशी समिती सुधा नेमली आहे

error: Content is protected !!