कोरोन पाठोपाठ चीन मधून एचएमपीव्ही व्हायरसचा धुमाकूळ
नवी दिल्ली – .चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या एचएमपीव्ही व्हायरसचे तीन रुग्ण आता भारतात आढळले आहेत. कर्नाटक आणि गुजरातमध्ये बाळांना या व्हायरसची लागण झाली आहे. सर्दी, खोकला, आणि ताप ही याची प्रमुख लक्षणे आहेत. आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर असून, व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसने आता भारतातही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात एचएमपीव्ही व्हायरसचे तीन रुग्ण आढळले आहेत. दोन रुग्ण कर्नाटकात सापडले तर आता एक रुग्ण गुजरातमध्येही आढळला आहे. गुजरातच्या अहमदाबादमद्ये एकाला लागण झाली आहे. कर्नाटकात एका आठ महिन्याच्या मुलाला आणि तीन महिन्याच्या मुलीला व्हायरसची लागण झाली आहे. तर अहमदाबादमध्ये दोन महिन्याच्या मुलाला लागण झाली आहे. त्यामुळे भारतातही आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे.या व्हायरसची पहिली केस कर्नाटक आणि गुजरातच्या अहमदाबादमध्ये सापडली आहे. अहमदाबादमध्ये दोन महिन्याच्या मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत देशात एकूण तीन केसेस समोर आल्या आहेत. गुजरात सरकारनेही एचएमपीव्ही व्हायरसबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून संपूर्ण देशात खबरदारी घेतली जात आहे.
या नव्या व्हायरसची लागण झालेलं मूल हे मोडासा येथील आहे. त्याला अहमदाबादच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची रक्त चाचणी केल्यानंतर हा आजार झाल्याचं आढळून आलं आहे. सध्या मुलाची तब्येत चांगली आहे. सर्दी, तापाची लक्षणे दिसल्यावर त्याला अहमदाबादला आणण्यात आलं होतं.