छत्तीसगड मध्ये नक्षलवादी हल्ल्यात ९ जवान शहीद
विजापूर – छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य करण्यात आले आहे. कुटुरू रोड येथे नक्षलवाद्यांनी आयईडी पेरला होता, सुरक्षा दलाची वाहने जाताना हा स्फोट झाला. या आयीडी स्फोटात ९ जवान शहीद झाले आहेत. ८ हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत. सैनिकांची तुकडी ऑपरेशन करून परतत असताना हा स्फोट झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
नक्षलवाद्यांनी विजापूर जिल्ह्यातील कुटुरु – बेंद्रे रोडवर हा ब्लास्ट केला आहे. जेव्हा दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरची संयुक्त ऑपरेशन पार्टी ऑपरेशन करुन परतत होती. त्यावेळी दुपारी २.१५ वाजताह कुटरु पोलीस ठाणे क्षेत्रातील अंबेली गावाजवळ नक्षलवाद्यांनी घात लावून हा ब्लास्ट घडवला. या ब्लास्टमध्ये लष्कराचे वाहन टार्गेट होऊन मोठी जिवीतहानी झाली आहे. या स्फोटासाठी आयईडीचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे
नक्षलवाद्यांनी विजापूरमध्ये आयईडी स्फोट घडवून सुरक्षादलाचे वाहन उडविले आहे. या ब्लास्टमध्ये दंतेवाडा येतील आठ डीआरजी जवान आणि एक ड्रायव्हर सह नऊ जवान शहीद झाले आहेत. सुरक्षादल दंते वाडा, नारायणपूर आणि विजापूरच्या संयुक्त मोहिमेनंतर परतत असताना नक्षलवाद्यांना घात लावून हा स्फोट घडविल्याचे आयजी बस्तर यांनी म्हटले आहे.जेव्हा जेव्हा सरकार नक्षलवाद्यांविरोधात अशा प्रकारेचे मोठे ऑपरेशन करते तेव्हा नक्षलवादी अशा प्रकारचे भ्याड हल्ले करतात असे छत्तीसगडचे विधानसभा अध्यक्ष रमन सिंह यानी म्हटले आहे. नक्षलवादाच्या विरोधात छत्तीसगड सरकारने जे आक्रमक मोहिम सुरु केली आहे. तिचा वेग आणखी वाढविला जाणार आहे. सरकार अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही. त्यांच्या विरोधक कठोर कारवाई सुरु राहील असेही ते यावेळी म्हणाले आहे.