ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट ११ ठार ५८ जखमी

भोपाल -मध्य प्रदेशातील हरदा येथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५ ८ जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तातडीची बैठक बोलावून गृह सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी लष्कराचीही मदत घेण्यात आली आहे.
जखमींना मध्य प्रदेश सरकारच्या हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात येणार आहे. तर हरदा ते भोपाळ असा ग्रीन कॉरिडॉरही बनवला जात आहे. जेणेकरून रुग्णांना लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवता येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात आतापर्यंत दहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ६० हून अधिक घरांना या स्फोटाचा फटका बसला आहे. अपघातानंतर 100 घरे रिकामी करण्यात आली आहेत.
हरदा येथील या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघाताबाबत बैठक घेऊन गृह सचिवांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यादव यांनी केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
जखमींसाठी हरदा ते भोपाळ दरम्यान ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला आहे. भोपाळच्या हमीदिया आणि एम्समध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. हरदा दुर्घटनेतील मदतकार्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात एसीएस मोहम्मद सुलेमान यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. अध्यक्षांव्यतिरिक्त चार सदस्यांचाही समावेश आहे.
फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. याशिवाय पीएम रिलीफ फंडातून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना५० हजार रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

error: Content is protected !!