ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामुंबई

धुळवडीचा रंग दारूची झिंग- ७३ तळीरामानवर कारवाई


मुंबई – होळी हा हिंदूंचा पवित्र सण आहे पण शहरी भागात होळीपेक्षा धुळवडीची मोठी धमाल असते.मुंबईमध्ये तर धुळवडीला दारूचा महापूर असतो दारू पिऊन रंगाची उधळण करणे आणि सुसाट गाड्या चालवणे हे धुळवडीला नेहमीच असते पण अशा तळीरामांवर पोलिसांची सुद्धा नजर असते मुंबईत दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या अशाच ७३ तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आहे
मुंबईत तब्बल दोन वर्षांनंतर होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबईत वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. शिवाय दारू पिऊन वाहने चालू नये असे देखील आवाहन केले होते. मात्र यानंतरही मुंबईत मोठ्या प्रमाणावर तळीराम वाहन चालवताना आढळून आले. मुंबई वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईत तब्बल ६५ दुचाकी चालक आणि८ चार चाकी वाहन चालक तळीरामांवर कारवाईकेली आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी आज मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या सुमारे ६५ दुचाकी आणि ८ चारचाकी वाहनचालकांना पकडले. या सर्वांवर मोटार वाहन कायद्याच्या ड्रंक अँड ड्राईव्ह कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत वाहने चालवताना होणारा अपघात टाळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी नाके बंदिस्त ठेवण्यात आले होते.

error: Content is protected !!