ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

राजकीय भोंगे

या देशाचे काय होणार कुणास ठाऊक! पण एक मात्र खरं आहे शांततेने जीवन जगू पाहणाऱ्या सर्वसामान्य माणसासाठी आता हा देश सुरक्षित राहिलेला नाही.कारण या देशाची वाटचाल धार्मिक विद्वेशामुळे आणखी एका फाळणीच्या दिशेने सुरू आहे .आणि हे रोखणे वाटते तितके सोपे नाही.कारण लोकांनाच देशाची चिंता राहिलेली नाही .त्यामुळे काही लोक धार्मिक द्वेष भावना पसरवणाऱ्या लोकांच्या मागे फरफटत जात आहेत. तर काही लोक हतबल होऊन हे सगळ उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.अशा परिस्थितीत हा देश हे स्वातंत्र्य वाचवायचे तरी कसे? आज जे राजकीय पक्ष,त्यांचे पुढारी आणि त्यांच्या मागे धावणारे बिनडोक लोक जर स्वातंत्र्य पूर्व काळात असते तर या देशाला कदापि स्वातंत्र्य मिळाले नसते.हे असे लोक त्या काळात नव्हते हेच या देशाचे मोठे सुदैव! पण या अशा लोकांपासून देशाला वाचवायचे की रशिया प्रमाणे या देशाचे तुकडे पाडायचे याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे.कारण काही लोक धर्माला राष्ट्रवादाशी जोडून समाजात जातीपातीच्या भिंती उभ्या करीत आहेत.धर्माला रस्त्यावर आणून तणावाची धार्मिक तणाव निर्माण करीत आहेत धर्म आणि देश याची अनावश्यक भेसळ करून लोकांची माथी भडकावत आहे.जेंव्हा आपण देशाचा विचार करतो तेंव्हा त्यात धर्म आणि जात आणता नये कारण या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी रक्त सांडलेले आहे. गेल्या 70 वर्षात या देशाचा जो काही विकास झाला त्यात सर्व जाती धर्माच्या लोकांचे योगदान आहे असे असताना कुठल्या तरी एका धर्मासाठी दुसऱ्या धर्माच्या लोकांना दुखवायचे त्यांच्या धार्मिक परंपरांच्या आढयायचे आणि त्यांनी असे केले तर आम्ही तसे करू असे म्हणून वाद निर्माण करायचे हे काही बरोबर नाही .घटनेने या देशातील प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे.त्यामुळे नमाज असो की अजाण असो महा आरती असो की घंटानाद अथवा सार्वजनिक उत्सवांमध्ये ध्वनिक्षेपक लावणे असो हा सर्व धार्मिक स्वातंत्र्याचा च एक भाग आहे.आणि स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरपासून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत.अशावेळी एका धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्माच्या धार्मिक बाबींना विरोध करायचा आणि त्या लोकांनी त्याला प्रति विरोध करून वाद वाढवायचे याला काही अर्थ नाही. पण सध्या राजकारणात जाती धर्माचा चुकीच्या पद्धतीने आणि लोकांना भडकवण्यासाठी जो वापर केला जातोय तो देशाला विनाशाकडे नेणारा आहे.मुस्लिमांच्या मशिदींवरील भोंग्यातून दिली जाणारी अजाण ही काही तासभर नसते तरी सुधा दुसऱ्या धर्माच्या लोकांना त्याचा त्रास होत असेल तर ती बंद करायला हवी पण त्याच बरोबर गणेशोत्सव,नवरात्रोत्सव ,जयंत्या,पुण्यतिथी,महापूजा आदीच्या निमित्ताने जे ध्वनिक्षेपक लावून त्यावर मोठ्या आवाजात जी गाणी वाजवली जातात किंवा लग्न कार्यात जो डिजेचा दणदणाट असतो त्यानेही ध्वनी प्रदूषण होत असल्याने त्यालाही आला घालायला हवा .अर्थात ते बंद करा असे कुणीही म्हणत नाही पण किमान त्याच्या आवाजावर मर्यादा घालायला हव्या.वास्तविक हा संवेदनशील विषय आहे त्यामुळे त्यावर चर्चा करायलाच हवी असे काही नाही पण असे संवेदनशील विषय राजकारणा साठी वापरणे आणि त्यातून दोन समुदायाच्या लोकांमध्ये तेढ निर्माण करणे हे कुठे तरी थांबायला हवे

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करून हनुमान चालीसा बाबतचे जे आदेश दिले आहेत ते आता त्यांच्याच पक्षातील काही लोकांना मान्य नाहीत राज ठाकरे यांचे सुरवातीपासूनच पुण्यातील खास शिलेदार वसंत पवार यांनी राज ठाकरेंचा हनुमान चालीसा बाबतचा आदेश मानण्यास नकार दिला आहे तसेच मनसेतील जे मुस्लिम कार्यकर्ते आहेत ते दुखावले आहेत त्यातील काहींनी राजीनामे दिलेत तर काही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.मुस्लिम समाज हा मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंच्या सोबत होता कारण राज ठाकरे यांनी मनसेची स्थमना केल्यानंतर धर्मा पेक्षा स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्नांना मर्थी माणसाच्या न्याय्य हक्काचा प्रश्नांना अधिक महत्व दिले होते आणि त्यांचे हे धोरण मुस्लिम समाजालाही पटलेले असल्याने मुस्लिम समाज राजच्या मागे उभा राहिला त्यानंतर मनसेच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे जे 13 आमदार निवडून आले ते सर्वच्या सर्व काही हिंदू मतांवर निवडून आले नव्हते सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांना मते दिली होती असे असताना आता अचानक राजची भूमिका का बदलली आणि या बदललेल्या भूमिकेमुळे पक्षाचा फायदा होणार आहे का ? मग विनाकारण राजने अशा धार्मिक मुद्द्यांमध्ये पक्षाला का अडकवले ? हिंदूंच्या मतांसाठी जर का हा प्रयत्न असेल तर हिंदूंच्या मतांवर ऑलरेडी भाजप आणि शिवसेनेचा कब्जा आहे त्यात माणसे वाटेकरी झाला तरी मनसेला त्याचा फायदा होणार नाही.उलट मुंबई पुण्यासारख्या महानगरात हिंदू धर्मात जाती धर्माच्या पलीकडे पाहणारा जी एक बुद्धिजीवी वर्ग आहे तो मनसेच्या मराठीच्या तसेच भूमिपुत्रांच्या हक्काच्या मुद्द्यावर माणसे सोबत होता त्यात मराठी भाषिक मुस्लिम सुधा आहेत पण राजच्या राजकीय भोंग्याने तेही आता दुखावले आहेत .

error: Content is protected !!