ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

योगेश वसंत त्रिवेदी यांना अप्रतिम मीडियाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर ; हेमंत जोशी आणि प्रकाश कथले यांनाही जीवनगौरव लवकरच समारंभपूर्वक देणार ; डॉ. अनिल फळे यांची घोषणा

मुंबई, दि. (प्रतिनिधी)  : ‘अप्रतिम मीडिया’च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२२’चे पुरस्कार जाहीर करण्यात आले. २०२०, २०२१ या दोन वर्षांमध्ये संबंधित पत्रकारांनी केलेली पत्रकारिता,  विशेष वृत्तांकन, विश्लेषण व पुरस्कार निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी आदी निकष लावण्यात आले होते. त्यानुसार राजकारण ते पर्यावरण वृत्त गटातून प्रथम, द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ अशा श्रेणीचे पुरस्कार घोषित करण्यात येत आहेत, अशी माहिती अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ. अनिल फळे, संचालिका सौ. प्रीतम फळे, निमंत्रक सर्वश्री राहुल सिंघवी, रणजीत कक्कड, मानस ठाकूर, जगदीश माने, निशांत फळे यांनी दिली.

यंदाचा जीवनगौरव पुरस्कार मुंबईचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, ऑफ दि रेकॉर्ड चे संपादक, ज्येष्ठ पत्रकार हेमंत जोशी आणि वर्धा येथील जेष्ठ पत्रकार प्रकाश नथुजी कथले यांना घोषित करण्यात आला आहे. 

योगेश वसंत त्रिवेदी यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव त्रिवेदी यांनी आहुति या अंबरनाथ, जि. ठाणे येथून ११ जून १९६६ रोजी सुरु केलेल्या साप्ताहिकापासून आपली पत्रकारिता सुरु केली. नवशक्ति, मुंबई सकाळ, सन्मित्र, ठाणे वैभव बाळासाहेब ठाकरे यांच्या संपादकत्वाखाली सुरु झालेल्या दैनिक ‘सामना’ मध्ये १५ डिसेंबर १९८८ पासून १९ ऑक्टोबर २०१३ पर्यंत उपसंपादक, वरिष्ठ वार्ताहर म्हणून काम केले. बाळासाहेब ठाकरे यांनी मुलाखत घेऊन निवडलेले आणि सातत्याने पंचवीस वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले पहिले पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी आहेत. सामना मधून सेवानिवृत्त झाल्यानंतर गुजरात समाचार बरोबरच महाराष्ट्रातील बऱ्याच वर्तमानपत्रात योगेश त्रिवेदी यांचे राजकीय विषयावर लिखाण सुरु आहे. विविध मराठी, गुजराती, हिंदी वृत्तवाहिन्यांवर ते राजकीय विश्लेषक म्हणून नावारूपाला आले आहेत. गेल्या दोन वर्षांत ‘पासष्टायन’ आणि ‘गुरुजी’ ही दोन पुस्तके योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहून राजकारणात आणि पत्रकारितेत काम करणाऱ्यांसाठी संदर्भ उपलब्ध करुन दिले आहेत. त्यांना एनयुजे तर्फे माजी खासदार, अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या शुभहस्ते जीवनगौरव पुरस्कार २४ डिसेंबर २०२१ रोजी एका शानदार समारोहात प्रदान करण्यात आला. ६ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभूर्ले जि. सिंधुदुर्ग येथील निवासस्थानी लोकमत चे संपादक वसंतराव भोसले यांच्या हस्ते दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात येऊन सन्मानित करण्यात आले.

यंदाचे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे :-

जीवन गौरव : योगेश वसंत त्रिवेदी (मुंबई), हेमंत जोशी (मुंबई), प्रकाश कथले (वर्धा).

टीव्ही न्यूज चॅनेल टीम लीडर :– आशुतोष पाटील, संपादक, न्यूज १८ लोकमत (मुंबई).

माध्यम उद्योजकता व संपादकीय नेतृत्व :– मदन चंद्रभान काळे (शिरूर, जि. पुणे) संवाद लाईव्ह टीव्ही & साप्ताहिक संवाद वाहिनी.

पर्यावरण वृत्त गट :- प्रशांत सिनकर (ठाणे – महाराष्ट्र टाईम्स), महेश दिगंबर जोशी (औरंगाबाद – दिव्यमराठी), दिनकर शिंदे (गेवराई जि.बीड – पार्श्वभूमी).

वने व इको टूरिझम वृत्त :- अरुण तम्मडवार (किनवट, जि. नांदेड – पुढारी), श्यामकुमार पुरे (सिल्लोड – लोकमत), राजेंद्र आसाराम भोसले (कन्नड, जि. औरंगाबाद – मुक्त पत्रकार).

विकास वृत्त :- शाश्वत गुप्ता रे (पणजी, गोवा – मुक्त पत्रकार), विलास ओव्हाळ (पणजी, गोवा -पुढारी).

स्थानिक पर्यटन वृत्त :- मकरंद मधुकर जाधव (श्रीवर्धन, जि. रायगड – दैनिक वादळवारा), नितीन मोरे (कंधार, जि. नांदेड – आदर्श गांवकरी), दादासाहेब घोडके (पैठण – एमसीएन न्यूज).

उद्योग / व्यापार वृत्त :- चंद्रन महादेवन अय्यर, पुणे (मासिक कार्पोरेट टायकून्स).

कला-संस्कृती वृत्त गट :- श्रीकांत गोपाळराव सराफ औरंगाबाद (दिव्य मराठी).

कृषी वृत्त :- राहुल दत्तात्रय कुलकर्णी (गंगापूर – सकाळ अग्रोवन), पूनम सुनील सकपाळ (नवी मुंबई- लोकसत्ता), सदाशिव खेमचंद फुले (सिल्लोड – दिव्य मराठी), विजय एकनाथराव चौधरी (खुलताबाद – महाराष्ट्र टाईम्स).

शैक्षणिक वृत्त :- महालसिंग भिसे (गंगाखेड, जि. परभणी – दैनिक लोकप्रश्न), विजय कुलकर्णी (परभणी -दैनिक लोकनेता).

आरोग्य वृत्त :- जान्हवी प्रसाद पाटील (ठाणे – महाराष्ट्र टाईम्स), रमाकांत फकीरा पाटील (नंदुरबार- लोकमत), फिरोज बशीर पिंजारी (खोपोली- दैनिक कोकण प्रजा), मनीषा अभिजीत हिरप (औरंगाबाद -मासिक-हेल्दी). सोसायटी).

साहित्य संवाद गट :- महाराष्ट्र मित्र, पुणे (साहित्य संवाद उपक्रम), मुकुंद अर्जुनराव बाविस्कर (नाशिक – मुक्त पत्रकार).

ग्रामीण विकास वृत्त :- नवनाथ गोपीनाथ इधाते (फुलंब्री जि औरंगाबाद – सकाळ), उमेश रमेश अलोणे (अकोला, विदर्भ – एबीपी माझा), विश्वास आरोटे (अकोले जि. अहमदनगर – दैनिक गांवकरी), सुनील ढेपे (उस्मानाबाद – उस्मानाबाद लाइव्ह डॉट काम).

सहकार वृत्त :– शफिक मोहम्मद बागवान (श्रीरामपूर – दैनिक राष्ट्र सह्याद्री), सिद्धेश्वर केशुबा गिरी (सोनपेठ – दैनिक एकमत).

पत्रकारिता अध्यापन गट :- डॉ. संध्या मोहिते, औरंगाबाद (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ).

स्थानिक विकास वृत्त :- कन्हैया सत्यनारायण खंडेलवाल (हिंगोली – एन.डी. टीव्ही), पल्लवी राजेंद्र नाईक (सोलापूर – २२.७ बिग एफएम), मकरंद बांगर, (हिंगोली – मुक्त पत्रकार).

राजकीय वृत्त :- उन्मेष गुजराथी मुंबई (स्प्राउटस डॉट कॉम), भास्कर लोंढे (नागपूर -लोकशाही वार्ता), प्रकाश दयाराम हांडे (न्युज ३४ -चंद्रपूर), सचिन सुहासराव काटे (हैद्राबाद – इटीव्ही भारत).

सामाजिक वृत्त :- देवेंद्र त्रिंबकराव भुजबळ (पुणे – न्यूज स्टोरी टुडे), सचिन रावसाहेब बड़े ( औरंगाबाद – लोकशाही टीव्ही).

शासकीय योजना वृत्त :– मोसिन शेख (मॅक्स महाराष्ट्र – औरंगाबाद),

स्थानिक स्वराज्य संस्था वृत्त :- उन्मेष देशपांडे (औरंगाबाद – महाराष्ट्र टाईम्स), मनोज कुलकर्णी (नाशिक – टीव्ही ९), कैलास उत्तम ढोले (अहमदनगर – मुक्त पत्रकार).

युवा क्षेत्र वृत्त :- हरीश राजेंद्र शर्मा, औरंगाबाद (सकाळ).

धार्मिक क्षेत्र वृत्त :- हनुमंत चिटणीस, पाथरी, जि. परभणी (मुक्त पत्रकार).

आर्थिक वृत्त :– विलास माणिकराव बडे (मुंबई – न्यूज १८ टीव्ही), अनिकेत अरविंद पेंडसे (मुंबई – लोकमत ऑनलाईन).

गुन्हेगारी वृत्ते :- नरेश डोंगरे, नागपूर (लोकमत).

प्रेस फोटोग्राफी :- रवी खंडाळकर, मनोज पराती (दिव्य मराठी), विजय भावसार (नांदगाव, जि. नाशिक).

ग्राफिक डिझाईनिंग पत्रकारेतर गट :- महेश सोनाजी विसपुते (औरंगाबाद).

error: Content is protected !!