ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

त्यांच्या तोंडून कधी शिवाजी महाराजांचे नाव नाही निघाले- राज ठाकरेंचा शरद पवारांवर जोरदार हल्ला बोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेतून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. तसंच शरद पवारांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या नाराजीनाट्यावरही राज ठाकरे यांनी खास त्यांच्याच शैलीमध्ये टोलेबाजी केली. अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले.

‘काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना कोणाच्यातरी डोक्यात खूळ आलं, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवायचं. मी काय बोललो ते राहिलं बाजूला, राष्ट्रवादीच्या लोकांनी पसरवायला सुरूवात केली की राज ठाकरेंचा शिवछत्रपतींच्या स्मारकाला विरोध आहे. परवाच्या दिवशी राजीनामा दिलेल्या आणि आता असलेला अध्यक्ष, या माणसाच्या तोंडातून कधी शिवछत्रपतींचं नाव यायचं नाही, सगळी भाषणं काढून बघा त्यांची. शाहू, फुले, आंबेडकर मोठे होतेच, पण सर्वप्रथम शिवछत्रपतींचं नाव घेतलं पाहिजे. आमची ओळख शिवछत्रपतींची ओळख आहे. त्या महापुरुषाचं नाव आजपर्यंत कधी घेत नाहीत, घेत नव्हते त्यांनी राज ठाकरे शिवछत्रपतींच्या पुतळ्याला विरोध करतोय हे पसरवायला सुरूवात केली,’ असा घणाघात राज ठाकरेंनी केला.दुसरीकडे शरद पवारांनी अजित पवारांमुळेच राजीनामा मागे घेतल्याचं विधान केलं. ‘राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता तो काल संपला. त्यांना खरच राजीनामा द्यायचा होता, असं मला खरंच वाटतं. पण राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागले आहेत. हे तू गप्प बसं, ए तू शांत बस, तू माईक हातातून घे. हे सगळं होत असताना पवार साहेबांच्या मनात आलं असणार, मी आता राजीनामा दिलाय, हा माणूस असा वागतोय, खरंच दिला तर उद्या मला पण गप्प बस सांगेल. त्या भीतीपोटी शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. आता असं वागतायत, पुढे कसं वागतील, भानगड नको, म्हणून त्यांनी राजीनामा मागे घेतला,’ असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

‘काय चालू होतं, काही पोच नाही. जवळपास आतून उकळ्या फूटत होत्या, होतंय ते बरं होतंय. माझ्या मुलाखतीमध्ये मी काकांकडे लक्ष द्या, हे सांगितलं होतं. ते कधी कोणती गोष्ट करतील ते सांगता येत नाही. तो त्यांच्या पक्षातला विषय आहे, आपल्याला त्याच्यामध्ये काही देणं घेणं नाही,’ असं राज ठाकरे म्हणाले

error: Content is protected !!