ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

शिवशाही कधी येणार ?

शिवराज्याभिषेक दीन जवळपास 350 वर्षांपूर्वी  दिवस रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान असा शिवराज्याभिषेक झाला .वास्तविक हा दिवस केवळ रायगडावर च नव्हे तर महाराष्ट्राच्या घराघरात साजरा व्हायला हवे .आजच्या दिवशी सुधा घरांवर गुढ्या तोरणे लावायला हवीत .महाराजांनी या मराठी मातीतल्या प्रत्येक माणसाच्या सुरक्षेसाठी,विकासासाठी,लेकी बाळीच्या कुल शिल रक्षणासाठी आयुष्यभर परकीय आक्रमण कारी शत्रूंशी संघर्ष करून स्वराज्याचे तोरण बांधले आणि हे पुण्याचे कार्य करताना मराठी मातीतील सर्व जाती धर्माच्या लोकांना भगव्या झेंड्याखाली आणून या स्वराज्याची स्थापना केली . त्यामुळे महाराजांचा राज्याभिषेक हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक नवे पर्व होते .शिवशाही पर्व!आणि या शिवशाही पर्वात संपूर्ण महाराष्ट्र सुखी समाधानी आणि सुरक्षित होता महाराष्ट्राच्या दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचा फार काळं सहवास महाराष्ट्राला लाभला नाही पण त्यांच्या पश्‍चात शिवशाही टिकवण्याचे आणि वाढवण्याचे काम छत्रपती संभाजी महाराज,राजाराम महाराज, माता ताराराणी,शाहू महाराज यांनी केले या सर्वांच्या हयातीत औरंगजेबाला महाराष्ट्रात यत्किंचितही यश मिळाले नाही . अखेर महाराष्ट्र जिंकण्याचे नापाक स्वप्न उराशी कवटाळून तो इथेच अल्लाला प्यारे झाला आदिल शहा असो निजामशहा असो मोघल बादशाह असो की टोपीकर इंग्रज असोत कुणालाही या मराठी मातीवर सत्ता गाजवता आली नाही . इतका या मातीचा कण आणि कण महाराजांनी आणि पुढे त्यांच्या वारसदारांनी मजबूत करून ठेवला आहे.आणि म्हणूनच या महाराष्ट्रात पुन्हा शिवशाही यावी या मराठी मातीत शिवराया सारखे पोलादी युगपुरुष निर्माण व्हावेत असे प्रत्येकाला वाटते . कारण महाराष्ट्र तेंव्हाही कधी कोण समोर झुकला नाही आणि आताही झुकणार नाही अशी शिवरायांच्या या महाराष्ट्राची ओळख आहे.शिवशाही ही इथल्या प्रत्येक मराठी माणसाची प्रेरणा स्त्रोत आहे.त्यामुळे शिवशहीतले प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक घटना येणार्‍या प्रत्येक पिढीला कळायला हव्यात यासाठी या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.महाराजांनी स्वराज्य लढून मिळवलेले आहे आणि इथले जवळपास 400 गड किल्ले त्याचे साक्षीदार आहेत.त्यामुळे प्रत्येक गड किल्ल्यांवर शिवराज्यभिषेक सोहळा साजरा व्हायला हवा पण आज या गड किल्ल्यांची अवस्था पाहता रायगड सह काही मोजकेच किल्ले आहे जिथे किमान जाण्याची फेरफटका मारण्याची व्यवस्था आहे मात्र इतर किल्ल्याची दुरवस्था वेदनादायी आहेत हे गड किल्ले पर्यटकांचे आकर्षण बनू शकतात आणि त्या माध्यमातून देश विदेशातल्या लोकांना शिवशाहीचा आणि त्या गडकिल्ल्यांछा इतिहास कळू शकतो . प्रत्येक गड किल्याचा स्वतंत्र असा एक इतिहास आहे आणि त्या इतिहासाची नाल महाराजांच्या पराक्रमाशी आणि स्वराज्याच्या निर्मिती शी जोडलेली आहे त्यामुळे महाराजांचा स्वराज्याभिषेक सोहळा हा प्रत्येक गड किल्ल्यावर आज साजरा व्हायला हवा होता पण इथल्या कुठल्याही सरकारने त्यांबत कधीही गांभीर्याने विचारच केलेला नाही हेच या गडकिल्ल्यांचे आणि शिवशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल 
सरकारला जर काही करता येत नाही तर शिवाजी महाराजांच्या नावावर सत्तेत आणि सत्तेच्या अवती भोवती राहून करोडो रुपये कमावणार्‍या राजकीय पुढार्‍यांनी याबाबत पुढाकार घ्यायला हवा .पण गड किल्ल्यांचा ताबा पुरातत्व विभागाकडे आहे आम्ही काय करणार असे सांगून आपले हात झटकायचे हेच काम इथल्या पुढार्‍यांनी केले आहे .एरव्ही पुतळे गार्डन आणि आपल्या बंगल्यांच्या सुशोभीकणासाठी करोडो रुपये खर्च करणारे मंत्री संत्री आज ज्या महापुरुषां मुळे हे वैभव उपभोगत आहेत . त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी त्यांच्याकडे किंवा सरकारकडे पैसा नाही हे एकूण खूप वाईट वाटते आज छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्यभिषेक सोहळा फक्त रायगडावर साजरा होत आहे आणि महाराजांचे इतर गडकिल्ले मात्र उजाड भकास अवस्थेत आहे . तिथवर प्रशासन पोचलेले नाही यापुढेही कदाचित पोचेल की नाही हे सांगता येत नाही त्यामुळे शिवप्रेमींनी आता याबाबत पुढाकार घेऊन सरकार आणि सरकारमधील झोपलेल्या पुढार्‍यांना जागे करायचे काम करावे 
error: Content is protected !!