ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

कोल्हापूर बंदला हिंसक वळण -पोलिसांचा लाठीमार, इंटरनेट बंद


कोल्हापूर – औरंगजेब आणि टिपू सुलतान यांच्या स्टेटस मध्ये कोल्हापुरात हिंसाचार उसळला होता . काल कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागताच पोलिसांना लाठीमार करावा लागला. आता खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा काही तासांसाठी बंद करण्यात आलीआहे.
कोल्हापुरातील काही तरुणांनी औरंगजेबाचं आणि टिपू सुलतानचं स्टेटस ठेवलं होतं, त्यानंतर हा राडा झाला. त्यानंतर शहरातील काही भागात परिस्थिती तणावपूर्ण बनली. काही भागत दगडफेकीच्या घटनाही घडल्या. त्यामुळे प्रशासनाने आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर शहरातील सात तरुणांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो ठेवले आणि इथंच वादाची ठिणगी पडली. या स्टेटस विरोधात आज हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. कार्यकर्ते आधी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले, नंतर ते मोर्चा काढणार होते. पण मोर्चा काढण्यास पोलिसांनी मनाई केली. यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि घोषणा देऊ लागले. अखेर त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अश्रुधुराचाही वापरही करण्यात आला. दुपारी साडे बाराच्या सुमाराला स्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, शिवाजी चौक आणि महापालिका मुख्यालय परिसरातील तणाव निवळून आता शांतता निर्माण झालीय.

error: Content is protected !!