ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

विस्तार स्वातंत्र्य दिना पूर्वी


मुंबई/ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथ विधी होऊन आता महिना व्हायला आला तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही त्यामुळे नव्या सरकारवर सर्वांकडून टीका होत असतानाच आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे त्यानुसार मंत्रिमंडळाचा विस्तार स्वातंत्र्य दीना पूर्वी केला जाणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत
शिवसेनेतील बंडखोरी नंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती करून सरकार स्थापन केले पण केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचाच शपथ विधी झाला मात्र 16 आमदारांवर अपात्र तेची टांगती तलवार असल्याने आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने मंत्री मंडळाचा विस्तार होऊ शकला नाही . परिणामी राज्याचा कारभार प्रशासनाच्या हाती आहे पण आता 15 ऑगस्ट पूर्वी म्हणजे 10 किंवा 11 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचे संकेत स्वतः उप मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत दरम्यान विस्तारत मंत्रिपदाच्या वाटपावरून दोन्ही गटात तणाव असल्याची चर्चा आहे तर मंत्रिपदासाठी शिंदे गटात सुधा तनतानी असल्याचे समजते पूर्वी जे मंत्री होते त्यातील काही जणांच्या नावाला विरोध आहे त्यात दीपक केसरकर यांच्या नावाला राणे यांचा विरोध असल्याचे समजते अशा परिस्थितीत हे सरकार किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही असे लोक म्हणत आहेत

error: Content is protected !!