ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबई

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये सचिन गाढवे, वृषाली पाटील, राहुल भालेराव, विलास बोडके, युवराज पाटील आणि किरण मोघे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मंत्रालयात सहाय्यक संचालक पदावरील गाढवे यांची बदली माहिती अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय पुणे तर पुण्यातील सहाय्यक संचालक वृषाली वृषाली पाटील यांची बदली कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. अकोला येथील माहिती अधिकारी भालेराव यांची बदली जिल्हा माहिती कार्यालय ठाणे येथे माहिती अधिकारी पदावर करण्यात आली आहे.

बोडके हे जळगाव जिल्हा माहिती अधिकारी होते, त्यांची बदली धुळे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर करण्यात आली आहे. सातारा जिल्हा माहिती अधिकारी पाटील यांची बदली आता लातूर जिल्हा माहिती अधिकारी पदावर, किरण मोघे हे नंदुरबार जिल्हा माहिती अधिकारी होते, त्यांची बदली आता जिल्हा माहिती अधिकारी पुणे या कार्यालय झाली आहे.

error: Content is protected !!