ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबईराजकीय

खुश खबर! एक डोस घेतलेल्यांना सुद्धा रेल्वे प्रवासाची मुभा?–राज्याची हरकत नसेल तर केंद्र सरकारं परवानगी देण्यास तयार-रेल्वे राज्यमंत्री दानवे



मुंबई/ कोरोणाचा प्रादुर्भाव आता हळू हळू कमी होत आहे तसेच लसीकरण मोहीम सुधा वेगाने राबवली जात आहे अशा वेळी राज्य सरकार जर तयार असेल तर लसीचा एक डोस घेतलेल्यांना ही लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यास आम्ही तयार आहोत असे केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे .त्यामुळे आता सर्व रेल्वे प्रवाशांचे राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे
मंगळवारी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईतील सी एस टी ते दादर असा लोकल ट्रेनने प्रवास केला यावेळी रेल्वे स्थानकावर त्यांना काही प्रवाशांनी घेरले व एक डोस घेतलेल्यांना सुधा रेल्वे प्रवासाची परवानगी द्या अशी मागणी केली त्यावर राज्य सरकारची तयारी असेल तर त्यांनी आम्हाला तसे सांगावे आम्ही लसीचा एक डोस घेतलेल्यांना सुधा लोकल प्रवासाची परवानगी द्यायला तयार आहोत असे दांवेनी सांगितले. त्यामुळे आता सर्वसामान्यांना लोकल प्रवासची मुभा देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारवर अवलंबून आहे आणि टास्क फोर्स ने खोडता घातला नाही तर मुंबईतील ज्या प्रवाशांनी एक डोस घेतला आहे .त्यांना लोकल प्रवासाची परवानगी मिळू शकते करोना काळातील लॉक डाऊन मुळे गेल्या वर्षभरापासून सर्व सामान्यांना लोकल प्रवास बंद आहे केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठीच लोकल सुरू होत्या त्यामुळे मुंबई बाहेरून कामा साठी मुंबईला येणाऱ्या चाकरमानी लोकांना नाईलाजाने एस टी मधून प्रवास करावा लागत होता . मात्र एस स्टी मधील प्रवासात जाता येता सहा ते सात तास लागत होते त्यामुळे लोक वैतागले होते मात्र लसीकरण सुरू झाले आणि कोरोना हळू हळू आटोक्यात येवू लागला त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल ट्रेन सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली .पण टास्क फोर्स चे डॉकटर विरोध करीत होते मात्र सरकारवर लोकांचा दबाव वाढतच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वेचा पास देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार सध्या दोन डोस घेतलेले लोकच लोकल ट्रेनच्या प्रवास करीत आहेत .पण दोन डोस मधील ८४ दिवसांचे अंतर हे खूपच मोठे असल्याने एक डोस घेतलेल्यांना सुधा लोकल प्रवासाची मुभा द्यावी ही मागणी पुन्हा होऊ लागली पण त्यावर अजून तरी सरकारने विचार केला नव्हता पण काल रेल्वे राज्य मंत्री दानवे यांनी स्पष्टपणे सांगून टाकले की राज्य सरकारची हरकत नसेल तर एक डोस घेतलेल्यांना सुधा लोकल प्रवासाची मुभा द्यायला रेलवे तयार आहे .त्यामुळे आता उद्वव ठाकरे आणि त्यांचे महान सल्लागार असलेले टास्क फोर्स चे डॉकटर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

ास्क फोर्स चां नकार?
सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने केवळ लसीचा एक डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देऊ नये असे डॉक्टरांच्या टास्क फोर्स चे म्हणणे असल्याचे समजते त्यामुळे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जरी एक डोस घेतल्यावर मेहरबानी दाखवलेली असली तर राज्य सरकार टास्क फोर्स च्या इशाऱ्यावर नाचत असल्याने ही मागणी मान्य होणार नाही असेच दिसत आहे .

error: Content is protected !!