संपादक संजय आवटे आणि विजय मांडे संतोष पवार स्म्रुती पत्रकार पुरस्काराने सन्मानित!
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- कर्जत तालुक्यांतील जेष्ट पत्रकार संतोष पवार यांची आज ख्याती ऐकताना संतोष पवार सारखे दिग्गज पात्रकाराची कर्जत मतदार संघाला गरज होती, मात्र त्यांचे कोरोनाने निधण झाल्याने मतदार संघातील एक अभ्यासू पत्रकार हरपल्याने मतदार संघाचे मोठी हाणी झाली असल्याचे प्रतिपादन कर्जतचे आमदार महेद्रशेठ थोरवे यांनी केले आहे, माथेरान येथिल कम्युनिटी सभाग्रुहात आज कै. संतोष पवार यांचा नावाने राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आज करण्यात आले होते, त्या प्रसंगी आमदार थोरवे बोलत होते.
रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असणारे माथेरान येथिल जेष्ट पत्रकार कै. संतोष पवार यांचे मागील वर्षी कोरोनाने निधण झाले आहे. पवार यांचा निधणानंतर कर्जत प्रेस क्लब व माथेरान प्रेस क्लब यांचा संयुक्त विद्यमानाने या वर्षापासुन कै. संतोष पवार यांचा नावाने संतोष पवार स्म्रुती पत्रकारिता राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आज माथेरान येथे आज कै. संतोष पवार यांचा स्म्रुतीदिन निमित्त राज्यस्तरीय दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे यांना तर जिल्हास्तरीय पुरस्कार कर्जतचे पत्रकार विजय मांडे यांना देण्यात आले आहे. दरम्यान कै. संतोष पवार सारखा हुशार आणि होतकरु पत्रकाराचा कोरोना कालातील निधणाने मतदार संघाची मोठी हाणी झाल्याची खंत कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी येथे व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, कर्जत तालुक्यांतील माथेरान येथिल जेष्ट पत्रकार संतोष पवार यांचे गेल्यावर्षी ९ सप्टेंबर रोजी कोरोनाने निधण झाले होते. त्यामुळे कर्जतसह संपुर्ण रायगडात शोककला पसरली होती. कै. संतोष पवार यांनी अनेक व्रुत्तपत्रात काम केले होते, रायगड प्रेस क्लबचे ते माजी अध्यक्ष होते, मराठी पत्रकार परिषदेचे पवार सरचिटणीस आणि अधिस्विक्रुत समितीचे ते सदस्य होते. काही वर्षापासुन पवार हे महाराष्ट्र माझा २४ यु ट्युब चॅनल चालवीत होते. मात्र गेल्यावर्षी अचानक त्यांना कोरोना झाल्याने त्यांचे कोरोनात निधण झाले होते. संतोष पवार हे जरी निघुन गेले असले तरीही त्यांचा आठवणींना उजाला मिळावा व कै. संतोष पवार यांचे विचार जीवंत राहावे याकरता रायगड प्रेस क्लब संचालित कर्जत प्रेस क्लब व माथेरान प्रेस कल्बने यावर्षी पासुन पवार यांचा नावाने राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय पुरस्कार देणेचा उपक्रम चालु केला आहे.
त्यामुळे आज पहील्याच स्म्रुती दिनानिमित्त या वर्षाचा कै. संतोष पवार पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार दिव्य मराठी दैनिकाचे संपादक संजय आवटे यांना देण्यात आला आहे, तर जिल्हास्तरीय पुरस्कार कर्जतचे पत्रकार विजय मांडे यांना देण्यात आला आहे. माथेरान येथिल कम्युनिटी सभाग्रुहात हा पुरस्कार सोहळा पार पडला आहे. यावेळी या समारंभास मावळचे खासदार श्रीरंग (अप्पा) बारणे, कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे, जेष्ट कवी अरुण म्हात्र, लाकशाहीर संभाजी भगत, माहीती व जनसंपर्क उपसंचालक डॅा. गणेश मुळ्ये, माथेरानचा नगराध्यक्ष सौ. प्रेरणा सावंत, कर्जतचा नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, माजी नगराध्यक्ष अजय सावंत , माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, आकाश चौधरी, गटनेते प्रसाद सांवत, शहरप्रमुख चद्रंकात चौधरी यासंह संतोष पवार यांचा मातोश्री सुशिला धोंडू पवार, पत्नी मनिषा संतोष पवार, बहीण बेबीताई यासंह मुलगा मुलगी व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थितीत होते. यावेळी या सर्व मान्यवरांचा हस्ते कै. संतोष पवार यांचा जीवनावर “दिलखुलास” आणि “डेस्टीनेशन कर्जत” पुस्तीकेचे प्रकाशन मावळचे खासदार श्री बारणे व कर्जतचे आमदार महेद्रशेठ थोरवे यांचा हस्ते व मान्यवरांचा उपस्थितीत करण्यात आले. यावेळी या सर्व मान्यवरांनी कै. संतोष पवार यांचा आठवणींना उजाला दिला.
दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी कर्जत प्रेस क्लबचे संतोष पेरणे, धर्मानंद गायकवाड, संजय मोहीते, राहुल देशमुख, दर्वेश पालकर, जयवंत हाबळे, कांता हाबळे, अजय गायकवाड, संजय अंभगे, गणेश पवार, दिपक पाटील, गणेश पुरवंत, भुषण प्रधान, ज्ञानेश्वर बागडे, नितीन पारधी, ह्र्षीकेश कांबळे यांसह माथेरान प्रेस क्लबचे दिनेश सुतार, मिलिंद कदम, दत्ता शिंदे, चंद्रकांत सुतार, चद्रंकांत काळे, सुभाष हातोळे, अजय कदम, मुकुंद राजाने, गिरीश पवार, श्वेता शिंदे, तुषार जांभळे, रमाकांत तोरणे यांनी परीश्रम घेतले होते.