ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना आस्मान दाखवू- उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबई/ सोमवारी मुंबई दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर कडाडून टीका करताना उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे असे म्हटले होते त्यावर पलटवार करताना आम्हाला जमीन दाखविण्यासा आम्ही आस्मन दाखवू असा इशारा दिला आहे
मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता शिवसेना भाजपा मधील लढाई अधिक तीव्र होणार आहे कारण या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या अमित शहा यांनी पालिका निवडणुकीसाठी मिशन 150 ची घोषणा केली आहे यावेळी त्यांनी सत्ताधारी शिवसेनेवर कडाडून टीका केली होती 2019 चा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाबाबत आपण उद्धव ठाकरेंना कोणताही शब्द दिला नव्हता त्यांनी आमचा विश्वासघात केला याची शिक्षा त्यांना द्यायला हवी असे त्यांनी म्हटले होते त्यावर पलटवार करताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की ते काय आम्हाला जमीन दाखवणार आम्हीच त्यांना आसमन दाखवणार आहोत

मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे या अमित शाह यांच्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले, जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू. त्यांना बोलायचं ते बोलू द्या. थोडक्यात काय तर संघर्षाचा काळ आहे. शिवसेना संपवायला निघाले आहे. निष्ठाही कितीही बोली लावली तरी विकली जाऊ शकत नाही. नासलेल्या लोकांपेक्षा मूठभर निष्ठावंत कधीही बरे आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्रीपद ही माझी खासगी मालमत्ता नाही मुख्यमंत्री पद हवं असतं तर मी क्षणभरात सोडल असते. माझ्याकडे तेव्हाही 30-40 आमदार होते तेव्हाही त्यांना डांबून ठेवलं असतं. माझी देखील ममता बॅनर्जीकडे ओळख होती त्या आमदारांना तिकडे घेऊन गेलो असतो. किमान कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं, राजस्थानात त्यांना नेता आलं असत पण तो माझा स्वभाव नाही. त्यामुळे सर्वांना सांगितलं की, दरवाजा उघडा आहे. राहायचं असेल तर निष्ठेने राहा नसेल तर तिकडे जा. आता माझ्यासोबत निष्ठावंत कडवट शिवसैनिक आहेत.

यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार असा दावा शिवसेनेकडून केला जातोय. त्यामुळे शिंदे गट या मैदानासाठी ताकद लावणार हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे. आता गणपती आहे, त्यानंतर दसरा आहे, त्यावेळी दसरा मेळाव्याचं बघू असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. यावर देखील उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, दसरा मेळावा शिवाजी पार्क येथेच घ्यायचा आहे. दसरा मेळाव्यात मी सविस्तर आतापर्यंत बोलेल. मुख्यमंत्री पदाचा मास्क असायचा बोलताना जपून बोलावं लागायचं आता तसं नाही आहे.

error: Content is protected !!