मुख्यमंत्र्यांनी मुंबादेवीच्या दर्शनाला तर उप मुख्यमंत्री सिद्दी विनायकाच्या चरणी
उघडले मंदिराचे दार
नेत्यांची च गर्दी फार
मुंबई- करोनाच्या संकटांमुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेली मंदिरे काल पासून उघडण्यात आली मात्र पहिल्याच दिवशी देवदर्शन घेण्यासाठी राजकारण्यांनी गर्दी केली होती मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यानी सकाळी सहकुटुंब मुंबादेवी चे दर्शन घेतले तर उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन पूजा केली यावेळी बहुतेक मंदिरात मंत्री संत्री,आमदार खासदार आणि त्यांच्या कुटुंबीयांची च गर्दी दिसत होती
अनलॉक प्रक्रिये अंतर्गत उद्योग धंदे सुरू झाल्यानंतर मंदिरे खुली करावीत अशी मागणी जोर धरू लागली.पण टास्क फोर्सचा मंदिरे खुली करण्यास विरोध होता त्यामुळे मंदिरे खुली करण्यासाठी भाजपला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले होते तरीही सरकार एकात नव्हते .या प्रकरणी न्यायालयात याचिकाही दखल झाली होती तरीही काही उपयोग झाला नाही मात्र हॉटेल्स सुरू झाल्यावर मंदिरे सुरू करण्याबाबत सरकारवर दबाव वाढला आणि शाळांच्या पाठोपाठ मंदिरेही उघडण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार काल घट स्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरे खुली करण्यात आली यावेळी पहाटे पासूनच भाविकांची दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसह मुंबादेवी चे सकाळी दर्शन घेतले तर उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरात पूजा केली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात जावून दर्शन घेतले तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह नाशिकच्या कालिकामाता मंदिरात जावून आरती केली इतर मंत्र्यांनीही मंदिरे खुली होताच वेगवेगळ्या ठिकाणच्या मंदिरात कुटणबियांसह गर्दी केली त्यामुळे भाविकांना काही काळ बाहेरच ताटकळत राहावे लागले त्यामुळं भाविकांनी नाराजी व्यक्त केली अगोदर याच लोकांनी मंदिरे उघडू दिली नाहीत आणि आता मंदिरे खुली होताच दर्शनासाठी मात्र पहिला नंबर अशी प्रतिक्रिया भाविक व्यक्त करीत होते
बॉक्स/ अंबाबाईच्या मंदिरात बॉम्ब ची अफवा
काल पासून नवरात्रोत्स वाला सुरुवात झाली आणि याच शुभ मुहूर्तावर मंदिरेही उघडली त्यामुळे भाविकांचा उत्साह द्विगुणित झालाय .भाविकांची देवीच्या मंदिरात तुफान गर्दी लोटली होती आणि त्याच वेळी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा फोन गोवा कंट्रोल रमला आला त्यामुळे एकाच खळबळ मजली तात्काळ गोवा पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांना कळवले पोलिसांनी ताबडतोब मंदिर खाली करून बॉम्ब स्कवडला बोलावून तपासणी केली पण काहीच सापडले नाही शेवटी ती अफवा ठरली