ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष -धनुष्य बाण कोणाचे आज फैसला

मुंबई/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात धनुष्य बाण या चीन्हावरून जो वाद सुरू झाला आहे त्यावर आज निवडणूक आयोग निकाल देणार आहे. त्यामुळे धनुष्य बाण ठाकरेंना मिळणार की शिंदेंना की हे चिन्ह गोठवले जाणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.
शिवसेनेतून फुटलेल्या 16 आमदारांना अपात्र करण्या बाबतच्या याचिकेसह धनुष्यबाण या निवडणूक चिन्हं बाबतची याचिका सुधा सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पिठा क डे प्रलंबित होती मात्र काही दिवसापूर्वी त्यावर सुनावणी होऊन निवडणूक चिन्हाचा वाद सोडवण्याची निवडणूक आयोगाकडे सोपवली होती . त्यावर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना 7 ऑक्टोबर पर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते ते दोन्ही ज्ञानी सादर केले असून आज निवडणूक आयोग त्यावर निकाल देणार आहे . दरम्यान शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पात्र लिहून आपल्याकडे शिवसेनेचे 40 आमदार 12 खासदार 144 पदाधिकारी आणि 120192 सदस्य असल्याचे तसेच 11 राज्यातील प्रकारा नी आपल्याला पाठींबा देऊन आपली शिवसेनेच्या प्रमुख पदावर नियुक्ती केली आहे . त्यामुळे आपलीच शिवसेना खरी असून धनुष्य बाण हे चिन्ह आपल्यालाच मिळावे अशी मागणी केली आहे .त्यामुळे निवडणूक आयोग आज काय निकाल देणार याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे .

error: Content is protected !!