ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागून ८ ठार


मुंबई – गोरेगाव पश्चिम येथील जय भवानी या सात मजली इमारतीत पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत अनेक कुटुंबे जळून खाक झाली. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एकूण आठ कुटुंब राहतात. पार्किंग मध्ये मीटरचा स्फोट झाल्याने पहिला ते सात मजले आगीच्या धुरात दिसेनासे झाले . दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे.
पहिल्या मजल्यावर राहणारी १८ वर्षीय तिशा चौगुले हिची परीक्षा सुरू होती. काल रात्री ही अभ्यासाची ती तयारी करत होती. आग लागली तेव्हा कुटुंब सर्व खाली पळाले. पण, तिशा पुन्हा घरी चपल घ्यायला गेली. तिच्या कुटुंबाला वाटले की ती खाली आली पण ती चुकून दुसर्‍या घरी शिरली. जिथे धूर पसरला होता. ती तिथेच पडली आणि बेशुद्ध झाली. त्यातच तिचा जीव गेला. तिशाला रील्स बनवण्याची आवड होती.
अभ्यासात हुशार आणि घरात सर्वांची आवडती तिशा एका रात्रीत तिच्या कुटुंबाला सोडून गेली. तिशाच्या मृत्यूची बातमी अद्याप तिच्या आईला दिली नाही. कारण त्यांना ही सध्या दाखल केले आहे. तिशाची आई संजना चौगुले येणार्‍या प्रत्येकाला तिशा बदल विचारात असल्याचे तिचे वडील संजय यांनी सांगितले. या सह संजय यांची आई आक्का ताई ही सध्या रुग्णालयात दाखल आहे
लागल्यावर ती विझवण्यासाठी इमारतीत पाण्याची सोय नव्हती. इमारतीच्या लादी उखडल्या आहेत. तसेच लिफ्ट आधीपासून बंद आहेत. गेल्या 15 वर्षापासुन बोअरींग चे पाणी येत आहे. प्यायला ही पाणी मिळत नाही. आग विझवण्याची कुठलीही यंत्रणा इमारतीत उपलब्ध नसल्याचा आक्रोश तिशाचे वडी-
रात्री २ च्या सुमारास आग लागूनही तात्काळ अग्नीशमन दलाला संपर्क केला. मात्र तब्बल तीन तासानी अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, तोपर्यंत अनेक जण आत घुसमटले होते
१२वर्षीय दिया तुषमढ तिच्या कुटुंबासह एका वर्षांपूर्वी गोरेगाव मध्ये रहायला आली. जवळच्या शाळेत शिकणारी दिया खूप हुशार होती. दिया ही घरात छोटी मुलगी होती. जेव्हा आई , वडील आणि 3 बहिणी घराबाहेर गेल्या तेव्हा दियाने बहिणीचा हात सोडला आणि ती हरवली.
धुरात कोण कोणाला न दिसल्याने चुकामूक झाली. आणि दिया बेशुद्ध झाली. दियाची चुलत बहीण किरण तुषमढ हिने सांगितले की, दिया खाली कोसळली होती. तिला लोकानी पायाखाली चिरडले. तिच्या त्वचेला आणि छातीला मार लागल्याचे व्रण होते
चिरायू जाधव हा शेवटच्या वर्षात शिकतो. पाचव्या मजल्यावर राहत असून त्याचे पूर्ण कुटुंब सध्या रुग्णालयात दाखल आहे. संजय जाधव, साक्षी जाधव आण
या घटनेत सर्वाधिक नागरिकांना गुदमरल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धुरामुळे प्रत्येकाचा जीव गुदमरला आणि आगीच्या दाहामुळे लोकांना रुग्णालयात दाखल करून घेतल्याचे ट्रॉमा केअर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश सुखदेवे यांनी सांगितले

error: Content is protected !!